हिमा दासने महिन्यात पाचव्यांदा पटकाविले सुवर्ण

वृत्तसंस्था
रविवार, 21 जुलै 2019

ढिंग एक्स्प्रेस नावाने प्रसिद्ध झालेली युवा धावपटू हिमा दास हिची सोनेरी दौड सुरूच आहे. शनिवारी झेक प्रजासत्ताकमधील नोवे मेस्टोनाड मेटुजी ग्रां.प्री. स्पर्धेत हिमाने महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत अव्वलस्थान पटकावत सुवर्णपदकावर नाव कोरले. हे हिमा दास हिचे गेल्या महिनाभरातील पाचवे सुवर्णपदक आहे. 

प्राग : भारताची सुवर्णकन्या हिमा दास हिने महिनाभरात पाचव्यांदा सुवर्णपदक पटकाविण्याची कामगिरी केली आहे. हिमाच्या या कामगिरीचे देशभर कौतुक करण्यात येत आहे.

ढिंग एक्स्प्रेस नावाने प्रसिद्ध झालेली युवा धावपटू हिमा दास हिची सोनेरी दौड सुरूच आहे. शनिवारी झेक प्रजासत्ताकमधील नोवे मेस्टोनाड मेटुजी ग्रां.प्री. स्पर्धेत हिमाने महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत अव्वलस्थान पटकावत सुवर्णपदकावर नाव कोरले. हे हिमा दास हिचे गेल्या महिनाभरातील पाचवे सुवर्णपदक आहे. 

हिमाने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक फोटो शेअर करून यासंदर्भातील माहिती दिली आहे. झेक प्रजासत्ताक येथे 400 मीटर शर्यत अव्वलस्थानी राहत पूर्ण केली. हिमा हिने 52.09 सेकंद वेळेत शर्यत पूर्ण केली. याआधी  झेक प्रजासत्ताक येथे झालेल्या टबोर अ‍ॅथलेटिक्स मीट स्पर्धेत हिमाने 200 मीटर शर्यतीत सुवर्ण कामगिरी केली. 23.25 सेकंदाची वेळ देत सुवर्ण मिळविले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hima Das Wins Gold In 400m Race Fifth In A Month