आयपीएलचा सहपुरस्कार हॉट स्टारकडून रद्द

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

इंडियन प्रीमियर लीगचा आपला सहपुरस्कार हॉटस्टारने रद्द केला आहे. स्टार इंडियाने आयपीएलचे हक्क विकत घेतल्यावर लगेचच हॉटस्टार सहपुरस्कर्ते झाले होते.

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचा आपला सहपुरस्कार हॉटस्टारने रद्द केला आहे. स्टार इंडियाने आयपीएलचे हक्क विकत घेतल्यावर लगेचच हॉटस्टार सहपुरस्कर्ते झाले होते.

हॉटस्टारने सहपुरस्कार रद्द केला असला, तरी त्यांच्या डिजिटल प्रक्षेपण हक्कावर कोणताही अडथळा येणार नाही, असेही सांगितले जात आहे.

आयपीएलच्या सहपुरस्कर्त्यांचा करार 40 ते 80 कोटी रुपयांचा आहे. हॉट स्टारचा करार 42 कोटी रुपयांचा होता अशी चर्चा आहे. हॉट स्टारने मैदानावरील जाहिरातींसाठीचा करार रद्द केला असला, तरी त्यांचे डिजिटल प्रक्षेपण हक्क कायम आहेत. सरत्या आयपीएलच्या प्रक्षेपणास 74 टक्‍क्‍यांनी जास्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा हॉटस्टारने केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hotstar withdrew ipl sponsorship