छेत्रीच्या आवाहनास चाहत्यांचा हाउसफुल प्रतिसाद 

Housefull response to fans of Chetri's appeal
Housefull response to fans of Chetri's appeal

मुंबई - आमची हुर्यो करण्यासाठी का होईना पण मैदानात या, असे आवाहन भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने केले होते. त्याच्या या आवाहनास प्रतिसाद देत फुटबॉलप्रेमींनी इंडिपेंडन्स कपमधील भारत-केनिया लढत हाउसफुल केली. छेत्रीच्या ऐतिहासिक शंभराव्या लढतीच्या वेळी एकही जागा रिकामी नसेल, याची जणू खबरदारी घेतली गेली. 

अंधेरी येथील शहाजीराजे क्रीडा संकुलातील मुंबई फुटबॉल एरिनावर 1 जूनपासून स्पर्धा सुरू झाली. पहिल्या दिवसाच्या भारत-तैवान लढतीस खूपच कमी प्रतिसाद लाभला होता. आता सोमवारची भारत-केनया लढत सुरू होण्यापूर्वीच काही तास अगोदर स्टेडियम हाउसफुल असल्याचे सांगण्यात आले. या स्टेडियमची क्षमता 10 ते 15 हजार आहे. तरीही भारत-तैवान लढतीस दोन हजार 569 चाहतेच उपस्थित होते. त्यामुळे स्टेडियम प्रामुख्याने रिकामेच होते. 

छेत्रीने त्याच्या शंभराव्या लढतीस काही तास असताना हे आवाहन केले होते. तैवानविरुद्ध त्याने हॅटट्रिक केली, पण त्याला चाहत्यांचे फारसे कौतुक लाभले नव्हते. जागतिक क्रमवारीत भारतीय फुटबॉलने प्रगती केल्यावरही चाहत्यांनी पाठ फिरवणे धक्कादायक होते. त्यामुळेच छेत्रीने जगातील सर्वोत्तम खेळाची स्पर्धा भारतीय संघ खेळत असतो, त्या वेळी चाहत्यांचा पाठिंबा आवश्‍यक आहे, असे त्याने सांगितले. त्याच वेळी त्याने आमच्या खेळाचा दर्जा टीव्हीवर चाहते पाहत असलेल्या युरोपातील व्यावसायिक स्पर्धांइतका नसेल, पण आम्ही प्रयत्नांची शर्थ करीत असतो, असे त्याने सांगितले. छेत्रीच्या या व्हिडिओ ट्विटची दखल घेत सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीनेही चाहत्यांना स्टेडियमवर जाण्याचे आवाहन केले होते. 

सर्वाधिक गोल क्रमवारीत छेत्री आता जगात तिसरा 
तैवानविरुद्धच्या हॅटट्रिकमुळे सुनील छेत्री सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोलच्या क्रमवारीत आता तिसरा आहे. त्याचे आता (केनयाविरुद्धच्या लढतीपूर्वी) 59 गोल आहेत. त्याने अमेरिकेचा क्‍लिंड देम्पसी याला मागे टाकताना स्पॅनिश स्टार डेव्हिड व्हिला यास गाठले होते. आता पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी हेच त्याच्या पुढे आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com