पुणेकरांनो, क्रिकेटची तयारी सुरू करा!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 मार्च 2019

पुणे - क्रिकेट खेळायला आबालवृद्धांनाही आवडते. मग वाट कसली पाहता; करा तुमच्या सोसायटीतील लहान-थोरांना एकत्र आणि करा तुमची सोसायटी टीम. ‘सकाळ सोसायटी क्रिकेट लीग’ या पुण्यातील हौसिंग सोसायटीच्या हाफ पीच क्रिकेट लीगची नावनोंदणी सुरू झाली आहे. 

पुणे - क्रिकेट खेळायला आबालवृद्धांनाही आवडते. मग वाट कसली पाहता; करा तुमच्या सोसायटीतील लहान-थोरांना एकत्र आणि करा तुमची सोसायटी टीम. ‘सकाळ सोसायटी क्रिकेट लीग’ या पुण्यातील हौसिंग सोसायटीच्या हाफ पीच क्रिकेट लीगची नावनोंदणी सुरू झाली आहे. 

सोसायटीतील क्रिकेट खेळणारा प्रत्येकजण यामध्ये सहभागी होऊ शकतो. यात टेनिस बॉलचे हाफ पीच सामने रंगणार असून, रिव्हर्स ओव्हर आर्म बोलिंग असणार आहे. प्रत्येक इनिंग सहा ओव्हरची आहे. मात्र, तुमच्या टीममध्ये १२ ते ४५ हून अधिक वयाच्या खेळाडूंचा सहभाग बंधनकारक असणार आहे. या लीगचा अर्ज गेल्या गुरुवारी प्रसिद्ध झाला आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १० मार्च आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघास पहिले बक्षीस एक लाखाचे आहे. याशिवाय ‘मॅन ऑफ सिरीज’ला २५ हजार रुपये, ऑरेंज कॅप व पर्पल कॅपसाठी प्रत्येकी १० हजार रुपये; तर  बेस्ट फिल्डर व बेस्ट विकेट कीपरला प्रत्येकी पाच हजारांची बक्षिसे असणार आहेत.

स्पर्धेचे नियम व संघाचे स्वरूप 
  नोंदणी : १० मार्चपर्यंत. प्रत्येक संघात ८ व चार राखीव खेळाडू.
    वयोगट    खेळाडूंची संख्या                     
    १२ ते १९ वर्षे    २ खेळाडू
    १९ ते ३५ वर्षे    ३ खेळाडू
    ३५ ते ४५ वर्षे    २ खेळाडू
    ४५+ वर्षे    १ खेळाडू

  अर्ज  www.sakalsports.com/sclpune या साइटवर ऑनलाइन भरावा किंवा सकाळ कार्यालय, बुधवार पेठ, शिवाजीनगर व ‘सकाळ’, पिंपरी कार्यालय, बी झोन बिल्डिंग, पाचवा मजला, पिंपरी येथील ड्रॉप बॉक्‍समध्ये टाकावा.
  संपर्क : ९५१८३०४३६१, ७५१७९६६७७२ व 
ई- मेल ः scl2019@esakal.com 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक 
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Housing Society League in pune