ISL : पुणे सिटी एफसी आऊट;हैदराबाद फ्रॅंचाईजी घेणार जागा

Hyderabad franchise to take place of Pune city FC in ISL
Hyderabad franchise to take place of Pune city FC in ISL

मुंबई :  इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) यंदाच्या मोसमात हैदराबादमधील फ्रॅंचाईजीचा समावेश करण्यात आला आहे. ही फ्रॅंचाईजी पुणे सिटी एफसी संघाची जागा घेईल. 

पुणे सिटी एफसी संघाचे मालक असणाऱ्या वधावन समूहाने यापूर्वीच आर्थिक अडचणींमुळे आपण संघ बंद करत असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. 

आता नव्या मोसमात "आयएसएल'मध्ये हैदराबादमधील फ्रॅंचाईजी दिसेल, असे वृत्त गोल डॉट कॉम या संकेतस्थळाने दिले आहे. तेलंगणा एंटरप्रीन्यूएर आणि केरळा ब्लास्टर्सचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी वरुण त्रिपुरानेनी यांच्याकडे या फ्रॅंचाईजीची संयुक्त मालकी असेल. या संघाचे घरचे मैदाना अर्थातच गच्चीबोवली स्टेडियम असेल. या निर्णयाची अजून अधिकृत घोषणा अजून करण्यात आलेली नाही. नेस्टर गॉर्डिलो याच्या ट्रान्सफर प्रकरणात पुणे सिटी एफसी संघाने गैरव्यवहार केल्याचे उघड झाल्यामुळे त्यांच्यावर दोन विंडोत खेळाडूंची देवाण घेवाण करण्यावर बंदी आणली होती. अर्थात, ही बंदी हैदराबाद फ्रॅंचाईजीसाठी लागू नसेल, असे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com