IND vs AUS 4th Test : हा तर शुद्ध मूर्खपणा... ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाने रोहितच्या रणनितीवर ओढले ताशेरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs AUS 4th Test

IND vs AUS 4th Test : हा तर शुद्ध मूर्खपणा... ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाने रोहितच्या रणनितीवर ओढले ताशेरे

IND vs AUS 4th Test : बॉर्डर - गावसकर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांना दोन दिवस चांगलेच तंगवले. ऑस्ट्रेलियाने जवळपास दोन दिवस फलंदाजी करत 480 धावांचा डोंगर उभा केला. यात सलामीवीर उस्मान ख्वाजाच्या झुंजाल 180 धावांचा मोलाचा वाटा होता. त्याला कॅमरून ग्रीनने देखील 114 धावांची शतकी खेळी करून चांगली साथ दिली.

पहिल्या दोन कसोटीत दादागिरी करणाऱ्या भारतीय गोलंदाजांची चौथ्या कसोटीत झालेली अवस्था पाहून ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज खेळाडू इयान चॅपेल यांनी रोहित शर्मा आणि भारतीय गोलंदाजांच्या रणनितीवर सडकून टीका केली.

चॅपेल इएसपीएल क्रिकइन्फोशी बोलताना म्हणाले की, 'मला डावखुऱ्या फलंदाजाला भारताचे राऊड द विकेट गोलंदाजी करण्यावर एवढं प्रेम का आहे हे समजले नाही. याचा कोणताच अर्थ मला लागत नाहीये. मी जवळपास सर्व चांगल्या डावखुऱ्या फलंदाजांशी बोललो आहे. त्यांनी मला राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी खेळणे सर्वात कठिण असल्याचे सांगितले.'

चॅपेल पुढे म्हणाले की, 'बहुदा अराऊंड द विकेट गोलंदाजी करण्याची रणनिती ही इंग्लंडमध्ये उपयुक्त ठरेल. मात्र भारतात विशेषकरून उस्मान ख्वाजा सारख्या फलंदाजाविरूद्ध अशी रणनिती अवलंबने मूर्खपणाचे ठरते. ऑफ साईडचे फटके हे त्याचे बलस्थान आहे आज ते आपण पाहिलेच. तुम्ही त्याच्या पॅडच्या दिशने गोलंदाजी का करता. त्याला तर हेच हवं असतं. ख्वाजा संपूर्ण इनिंगमध्ये निवांत फलंदाजी करत होता. ख्वाजावर तोडगा काढला नाही तर तो भारतासाठी डोकेदुखी ठरतो.'

(Sports Latest News)

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण