World Test Championship चा नियम बदलला; भारतापेक्षा कमी गुण असलेला ऑस्ट्रेलिया टॉपला

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 November 2020

टीम इंडियाचे सध्या 4 मालिकेत 360 पॉइंट झाले आहेत तर ऑस्ट्रेलियाचे 3 मालिकेत 296 गुण झाले होते. 

नवी दिल्ली - इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचणाऱ्या संघांचा निर्णय गुणांच्या टक्केवारीच्या आधारावर घेतला जाईल असं जाहीर केलं आहे. त्यांच्या या निर्णयाचा फटका भारतीय क्रिकेट संघाला बसला असून ऑस्ट्रेलियाला फायदा झाला आहे. आता ऑस्ट्रेलिया पॉइंट टेबलमध्ये टॉपला पोहोचली आहे. 

आयसीसीने नव्या नियमानुसार रँकिंगही प्रसिद्ध केलं आहे. यानुसार टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर तर ऑस्ट्रेलिया पहिल्या नंबरवर पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियाचे गुण 82.2 टक्के तर भारताचे 75 पेक्षा जास्त आहेत. आयसीसीने संघांना सामन्यांमध्ये मिळालेल्या विजयाच्या गुणांची टक्केवारी काढली. ज्या मालिका कोरोनामुळे रद्द करण्यात आल्या त्या ड्रॉ असल्याचं मानलं गेलं. आयसीसीच्या या नियमामुळे ऑस्ट्रेलिया संघाला फायदा झाला. 

टीम इंडियाचे सध्या 4 मालिकेत 360 पॉइंट झाले आहेत तर ऑस्ट्रेलियाचे 3 मालिकेत 296 गुण झाले होते. नियम बदलण्याआधी भारतीय संघ पहिल्या तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी होते. आता नव्या नियमानुसार ऑस्ट्रेलिया पहिल्या तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानी इंग्लंड असून त्यांची 60.8 टक्के गुण झाले आहेत.

क्रीडा विश्वातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा SakalSports.com

आता भारताला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चांगली कामगिरी करावी लागेल. इतर संघांजवळ पॉइंट टेबलमध्ये वरचे स्थान पटकावण्याची संधी आहे. यजमान ऑस्ट्रेलियाला घरंच मैदान असल्याचा या मालिकेत फायदा होऊ शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: icc change world test championsip point table rule australi top india second