ICC कडून मोठी चूक; केला राहुल द्रविडचा अपमान

वृत्तसंस्था
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

भारताचा माजी फलंदाज आणि सध्याचा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा अध्यक्ष असेल्या राहुल द्रविडचे भारतीय क्रिकेटमधील योगदान खूप मोठे आहे. दि वॉल म्हणून प्रसिद्ध असेल्या द्रविडचे भारतीय चाहत्यांच्या मनात खूप अढळ स्थान आहे. त्याच्या बद्दल जगभरातील चाहत्यांना प्रचंड प्रेम आणि आदर आहे. मात्र, याच खेळाडूची माहिती देताना आयसीसीने मोठी चूक केली आहे. 

दुबई : भारताचा माजी फलंदाज आणि सध्याचा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा अध्यक्ष असेल्या राहुल द्रविडचे भारतीय क्रिकेटमधील योगदान खूप मोठे आहे. दि वॉल म्हणून प्रसिद्ध असेल्या द्रविडचे भारतीय चाहत्यांच्या मनात खूप अढळ स्थान आहे. त्याच्या बद्दल जगभरातील चाहत्यांना प्रचंड प्रेम आणि आदर आहे. मात्र, याच खेळाडूची माहिती देताना आयसीसीने मोठी चूक केली आहे. 

आता मी कसोटी क्रिकेट खेळणार नाही; क्रिकेटपटूचा धक्कादायक निर्णय

राहुल द्रविडचा नुकतेच आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे. हॉल ऑफ फेममध्ये समावेश होणारा तो भारताचा पाचवा खेळाडू आहे. मात्र, त्याच्याबद्दल माहिती देताना आयसीसीने मोठी चूक केली. आयसीसीने राहुल द्रविडला डावखुरा फलंदाज म्हणून संबोधले आहे.

Rahul Dravid, ICC Hall Of Fame

गेल्या वर्षी राहुल द्रविडचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याच्याबद्दल आयसीसीच्या साईटवर माहिती देणाऱ्या पेजवर त्याला डावखुरा फलंदाज असे संबोधले आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना आयसीसीसीवर टीकेची झोड उठविली आहे.  

INDvsSA : पंतला मिळालं या दिग्गजाकडून खास ट्रेनिंग; आता तरी सुधार!

Indian


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ICC Commit A Massive Blunder Calls Rahul Dravid As A Left Handed Batsman