भारतातील फुटबॉल प्रगतीची आयसीसीला चिंता

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 मे 2018

नवी दिल्ली - क्रिकेटवेड्या भारतीय उपखंडात फुटबॉलच्या वाढत्या प्रसाराची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेस चिंता वाटत आहे. याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला भेडसावणाऱ्या प्रश्‍नांबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि भारतीय क्रिकेट मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट होणार आहे.

भारतीय उपखंड हे क्रिकेटचे मोठे मार्केट आहे. त्यातील क्रिकेटच्या प्रसारणाचे हक्क मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्पर्धा होत नसल्याची चिंता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेस भेडसावत आहे. क्रिकेट प्रसारणाचे हक्क मिळवण्यासाठी स्टार आणि सोनी यांच्यातच स्पर्धा आहे. क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यास फारसे कोणी उत्सुक दिसत नाहीत. दोघांतच स्पर्धा होणार असल्यामुळे फारसे कोणी या स्पर्धेतही येत नाही, असे वरिष्ठ क्रिकेट पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

क्रिकेटच्या प्रसारण पाहणाऱ्या चाहत्यात, तसेच त्याच्या पुरस्कर्त्यातही घट होत आहे. त्याचबरोबर राजकीय संघर्षाचाही खेळावर परिणाम होत आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका झालेली नाही, याकडे लक्ष वेधले जात आहे.  

इंग्लंडमध्ये नियोजित असलेल्या शंभर चेंडूंच्या लढतीचाही धोका आहे. त्याचबरोबर कसोटी क्रिकेट जास्त काळ तग धरू शकणार नाही, या आजी-माजी खेळाडूंच्या वक्तव्याचीही गंभीर दखल घेण्यात आली आहे. अमिराती क्रिकेट मंडळाच्या मान्यतेने झालेली टी-१० लीगही गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: ICC concern for the progress of football in India