कसोटी क्रिकेटबद्दल मोठा निर्णय; आता कसोटी होणार...

वृत्तसंस्था
सोमवार, 30 डिसेंबर 2019

एका दिवसांत 98 षटके
चार दिवसांच्या कसोटी सामन्यात एका दिवसात 90ऐवजी 98 षटके खेळविली जातील. त्यामुळे चार दिवसांच्या कसोटी फक्त 58 षटके कमी होतील. 

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आता कसोटी सामना अधिकृतरित्या चार दिवसांचा करण्याची शक्यता आहे. क्रिकेटविश्वातील महत्वाच्या बोर्डांशी चर्चा केल्यानंतर आता 2023मध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत चार दिवसांची कसोटी खेळविली जाण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या मर्यादीत षटकांचे क्रिकेट मोठ्या प्रमाणात वाढले आहे. द्विपक्षीय मालिकांना पुरेसा वेळ मिळण्यासाठी बीसीसीआयची आयसीसीकडे ठराविक काळामध्ये कोणत्याही स्पर्धेचे आयोजन न करण्याआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आता कसोटी सामना अधिकृतरित्या चार दिवसांचा करण्याची शक्यता आहे. क्रिकेटविश्वातील महत्वाच्या बोर्डांशी चर्चा केल्यानंतर आता 2023मध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत चार दिवसांची कसोटी खेळविली जाण्याची शक्यता आहे.ची मागणी. तसेच एका वर्षात आयसीसीचे इव्हेंट्स वाढविण्यासाठी आयसीसी कसोटी सामने पाच दिवसांवरुन चार दिवसांवर आणण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. कसोटी चार दिवसांची केल्यास आयसीसीला इतर सामने आयोजित करण्यासाठी जास्तीचा वेळ मिळू शकतो.  

उदारणार्थ 2015 ते 2023 या कालावधीत पाचऐवजी चार दिवसांची कसोटी खेळविली गेल्यास तब्बल 335 दिवस वाचले असते. तसेच असे केल्याने तीन किंवा पाचपेक्षा जास्त कसोटी सामन्यांची मालिका खेळविता येऊ शकते. यामुळे यजमान देशाला आणि  लाही पाचव्या दिवसासाठी खर्च करावा लागणार नाही.  

आयसीसी 2023 मध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अधिकृतरित्या चार दिवसांची कसोटी सुरु करेल. 2018 पासून जवळपास 60 टक्क्यांहून जास्त कसोटू सामने चौथ्या दुवशीच संपले आहेत. त्यामुळे पुढील वर्षात आयसीसीशी संलग्न असलेल्या क्रिकेट मंडळांशी चर्चा करुन चार दिवसांची कसोटी खेळविण्यावर निर्णय घेतला जाईल. 

एका दिवसांत 98 षटके
चार दिवसांच्या कसोटी सामन्यात एका दिवसात 90ऐवजी 98 षटके खेळविली जातील. त्यामुळे चार दिवसांच्या कसोटी फक्त 58 षटके कमी होतील. 

टीम पेनचा विरोध 
ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड पुढील वर्षी अफगाणिस्तानविरुद्ध चार दिवसांची कसोटी खेळविण्याचीही शक्यता आहे. असे असले तरीही त्यांचा कसोटी कर्णधार टीम पेनला मात्र याला विरोध आहे. तो म्हणाला, ''ऍशेसमध्ये प्रत्येक सामन्याचा निकाल पाचव्या दिवशी लागला. त्यामुळे चार दिवसांच्या कसोटीचा कधीच निकाल लागला नसता. कसोची क्रिकेट मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या अवघड आहे. प्रथम श्रेणीसारख्या चार दिवसांच्या सामन्यांपेक्षा पाच दिवसांमध्ये खेळाडूंचा जास्त कस पाहिला जातो आणि ते तसेच रहावे असे मला वाटते.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ICC to consider mandatory four-day Tests