लिमयेच योग्य उमेदवार - बिंद्रा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

चंडीगड - सर्वोच्च न्यायालयाच्या बीसीसीआयवरील प्रशासक नियुक्तीनंतर क्रिकेटमधील माजी संघटकांपैकी पहिली प्रतिक्रिया आय. एस. बिंद्रा यांनी दिली असून, त्यांनी आयसीसीवरील प्रतिनिधित्वासाठी विक्रम लिमये योग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करताना बिंद्रा म्हणाले,‘‘प्रशासकांची नावे जाहीर होत नाही, तोवर मला झोप नव्हती. जेव्हा ही नावे जाहीर झाली, तेव्हा जीव भांड्यात पडला. योग्य उमेदवारांची नियुक्ती झाली असून, आता क्रिकेट संघटकांनी आतापर्यंत झालेल्या चुकांमधून शिकण्याची वेळ आली आहे.’’

बिंद्रा यांनी मत व्यक्त करतानाच आयसीसीवरील प्रतिनिधित्वासाठी विक्रम लिमये योग्य असल्याचे सुचविले आहे. लिमये बॅंकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ असल्यामुळे अर्थकारणाची बाजू ते समर्थपणे हाताळू शकतील. त्यामुळे आयसीसीच्या बैठकीसाठी लिमये यांनीच पुढाकार घ्यावा असे मला वाटते. भारतीय क्रिकेट आता कात टाकून उभे राहील असा विश्‍वास वाटत असल्याचेही मत त्यांनी मांडले.

Web Title: icc leader vikram limaye candidate