ICC Mens ODI Team: रोहित-विराटला ODI संघातुन डच्चू! बाबर कर्णधार अन् फक्त... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rohit sharma virat kohli

ICC Mens ODI Team: रोहित-विराटला ODI संघातुन डच्चू! बाबर कर्णधार अन् फक्त...

ICC Mens ODI Team of The Year 2022 : ICCने गेल्या वर्षी म्हणजेच 2022 चा सर्वोत्कृष्ट ODI संघ जाहीर केला आहे. पाकिस्तानच्या बाबर आझमला या संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला या संघात स्थान मिळालेले नाही. भारतातील फक्त 2 खेळाडू, श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराज हे ICC ODI टीम ऑफ द इयरमध्ये स्थान मिळाले आहे.

हेही वाचा: IND vs NZ: गंभीरनं 13 वर्षापूर्वी करून दाखवलं आता रोहित शर्माला आहे संधी

या संघात ट्रॅव्हिस हेड आणि अॅडम झाम्पा या दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा समावेश आहे. त्याचवेळी पाकिस्तानमधून बाबर आझमचेच नाव आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडच्या टॉम लॅथम आणि ट्रेंट बोल्ट या दोन खेळाडूं संघात स्थान आहेत.

हेही वाचा: Ishan Kishan: ICC इशान किशनवर घालणार बंदी? 'या' बालिश कृत्यामुळे झाला वाद

बाबर आझमने 2022 मध्ये 9 एकदिवसीय सामन्यांमध्ये 8 सामन्यात 50 पेक्षा जास्त धावा केल्या. यातील तीन डावांचे शतकात रूपांतर करण्यात तो यशस्वी ठरला. त्याने 2022 मध्ये 84.87 च्या सरासरीने 679 धावा केल्या. श्रेयस अय्यरने गेल्या वर्षी भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने कॅलेंडर वर्षात 17 सामन्यांत 55 च्या सरासरीने 724 धावा केल्या. त्याने 1 शतक आणि 6 अर्धशतके झळकावली.

हेही वाचा: IND vs NZ : रोहितचे कर्णधारपद जाणार? कोच द्रविडचे धक्कादायक विधान!

मोहम्मद सिराजसाठी गेले वर्ष अविस्मरणीय होते. त्याने विशेषत: एकदिवसीय सामन्यांमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत सिराजने भारतीय वेगवान आक्रमणाचे नेतृत्व केले आणि 15 सामन्यांमध्ये 4.62 च्या इकॉनॉमी रेट आणि 23 च्या सरासरीने 24 बळी घेतले. 29 धावांत 3 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.