पाकची बदनामी; रावळपिंडीच्या खेळपट्टीवर ICC नं दिला 'हा' शेरा

Rawalpindi Pitch Below Average
Rawalpindi Pitch Below AverageSakal

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील रावळपिंडीच्या खराब खेळपट्टीबाबत (Rawalpindi Pitch Below Average) आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. या सामन्यात केवळ 14 विकेट्स पडल्या. यातही एकाच गोलंदाजाला सहा विकेट मिळाल्या. अनेक दिग्गजांनी खेळपट्टीवर टीका केली होती. त्यानंतर आयसीसी (ICC) या खेळपट्टीबाबत काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या.

आयसीसी एलीट पॅनलचे मॅच रेफ्री रंजन मदुगले यांनी रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टीला सरासरीपेक्षा खराब खेळपट्टी असल्याचे (below average) रेटिंग दिले आहे. रेटिंगमुळे आता पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामना ज्या खेळपट्टीवर झाला त्या स्टेडियमला एक डेमेरिट पाँइंट्स दिलाय. आयसीसी पिच अँण्ड आउटफील्ड मॉनिटरिंग प्रोसेसच्या माध्यमातून क्रिकेटच्या सर्वोच्च संस्थेने डेमेरिट पाँइंट दिल्यामुळे रावळपिंडी मैदानाला भविष्यात मोठा फटका बसू शकतो.

Rawalpindi Pitch Below Average
आकाश चोप्राची भविष्यवाणी रोहितला खटकली!

काय आहे डेमेरिट पाँइंट्सचा खेळ?

आयसीसी एलीट पॅनलचा मॅच रेफ्री खेळपट्टी सरासरी पेक्षा अधिक खराब असल्यास स्टेडियमला डेमेरिट पाँइंट देतात. खूपच खराब आणि अनफिट खेळपट्टीसाठी स्टेडियमच्या खात्यात अनुक्रमे 4 आणि 5 अंक जमा केले जातात. आउटफील्डसाठी सरासरीपेक्षा कमी रेटिंग दिले जाते. आउट फील्ड खराब आणि अनफिट घोषीत केल्यास 2 आणि 5 अंक असतात. एका स्टेडियमला तीन वर्षांत 5 डेमेरिट पाँइंटस मिळाले तर स्टेडियमवर एक वर्षांच्या बंदीची कारवाई करण्याची तरतूद आहे.

Rawalpindi Pitch Below Average
आकाश चोप्राची भविष्यवाणी रोहितला खटकली!

मॅच रेफ्रींनी खेळपट्टीबद्दल म्हटलंय की, पाच दिवसांच्या खेळात खेळपट्टीमध्ये फार बदल दिसला नाही. चेंडू उसळणे थोड कमी झालं. डाव पुढे सरकत असताना फिरकीपटूंनाही काहीच मदत मिळताना दिसली नाही. ही खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज यांना समान न्याय देणारी नव्हती, असा उल्लेखही त्यांनी केलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com