ICC Revenue Share : पाकिस्तानचा जळफळाट; म्हणतं आयसीसी उत्पन्नातील बीसीसीआयचा वाटा हास्यास्पद

ICC Revenue Share PCB vs BCCI
ICC Revenue Share PCB vs BCCIesakal

ICC Revenue Share : बीसीसीआयची नुकतीच सर्वसाधारण बैठक अहमदाबाद येथे पार पडली. या बैठकीत अनेक मुद्यावर चर्चा झाली. पाकिस्तानने आशिया कप 2023 साठी सुचवलेल्या हायब्रीड मॉडेलवर बीसीसीआयने विचारमंथन केले असून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या या हायब्रीड मॉडेलला बीसीसीआय विरोध करण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय अजून जाहीर केलेला नाही.

ICC Revenue Share PCB vs BCCI
MS Dhoni Fan IPL Final : धोनीसाठी चाहते रल्वे स्टेशनवरही झोपले... काहींना मिळाला विराटचा आडोसा

यामुळेच जळफळाट झालेल्या पाकिस्तानने भारताविरूद्ध आयसीसीमध्ये कुरापती करण्यास सुरूवात केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे बीसीसीआयला मिळणारा उत्पन्नातील वाट्याबाबत तक्रार करणार असल्याचे सांगितले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला मिळणारा उत्पन्नाचा वाटा हा हस्यास्पद आहे. याविषयी आम्ही आयसीसी चीफ ग्रेग बार्क्ले यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे पीसीबी म्हणते. ग्रेग बार्क्ले पाकिस्तानचा पहिल्यांदाच दौरा करणार आहेत.

आयसीसीच्या प्रस्तावित रेव्हेन्यू शेअर मॉडेलमध्ये बीसीसीआयला 38.5 टक्के वाटा असणार आहे. त्यानंतर इंग्लंडला 6.89 टक्के, ऑस्ट्रेलियाला 6.25 टक्के आणि पाकिस्तानला 5.75 टक्के इतका वाटा मिळणार आहे. मात्र पाकिस्तान या वाटणीवर खूष नाहीये. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आयसीसीच्या उत्पन्नात अजून चांगला वाटा मागत आहेत. वनडे रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर आहेत, त्यांचे अनेक क्रिकेटपटू आयसीसी रँकिंगमध्ये टॉप टेनमध्ये आहेत. त्यामुळे त्यांना अजून चांगला वाटा मिळालयला असा तर्क पाकिस्तान देत आहे.

ICC Revenue Share PCB vs BCCI
MS Dhoni IPL 2023 : 'कर्णधार नसेल तर तो संघातही...', धोनीवर भारतीय दिग्गज खेळाडूने केले मोठे वक्तव्य

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्याने जिओ टीव्हीशी बोलताना म्हणाले की, 'मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आमचे क्रिकेटपटू रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असतात. पाकिस्तान ही वनडे रँकिंगमध्ये दुसऱ्या आणि टी 20 क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. आम्हाला उत्पन्नात कमी वाटा कसा मिळू शकतो. पीसीबीला जाणून घ्यायचं आहे की हे रेव्हेन्यू मॉडेल कशाच्या आधारावर तयार केलं आहे.'

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com