esakal | ज्या नियमाने इंग्लंड झाले विश्वविजेते तोच नियम आयसीसीकडून रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

ICC scraps the decision of boundary count rule that decided Engalnd as winner of World Cup 2019

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने महत्वाच्या स्पर्धांसाठी "सुपर ओव्हर'चे नियम बदलण्याचा निर्णय सोमवारी घेतला. या नुसार आता सामन्यात मारण्यात आलेल्या सर्वाधिक चौकार किंवा षठकारांवर सामन्याचा विजेता ठरणार नाही. 

ज्या नियमाने इंग्लंड झाले विश्वविजेते तोच नियम आयसीसीकडून रद्द

sakal_logo
By
वृत्तसंस्था

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने महत्वाच्या स्पर्धांसाठी "सुपर ओव्हर'चे नियम बदलण्याचा निर्णय सोमवारी घेतला. या नुसार आता सामन्यात मारण्यात आलेल्या सर्वाधिक चौकार किंवा षठकारांवर सामन्याचा विजेता ठरणार नाही. 

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील सामना "सुपर ओव्हर'नंतरही "टाय' झाल्यावर सर्वाधिक चौकार मारल्यामुळे इंग्लंडला विजेते घोषित करण्यात आले होते. त्यानंतर "आयसीसी'ला माजी खेळाडू, क्रिकेट पंडितांपासून अगदी क्रिकेट चाहत्यापर्यंत सर्वांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. या घटनेच्या तीन महिन्यानंतर "आयसीसी'ने हा नियम बदलण्याचा निर्णय घेतला. 

"आयसीसी'च्या क्रिकेट समितीने केलेल्या शिफारसीनुसार आता "सुपर ओव्हर'मध्ये होणारा निर्णयच अंतिम धरण्यात येणार आहे. क्रिकेट समितीच्या या शिफारशीला आज प्रशासकीय समितीने मान्यता दिली. हा नियम इथून पुढे आता प्रत्येक एकदिवसीय आणि टी 20 क्रिकेटला लागू असेल. 

असे असतील नवे नियम 
"आयसीसी'च्या महत्वाच्या स्पर्धेत साखळीत एखादा सामना "टाय' झाल्यास तो "टाय'च धरण्यात येईल. उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी नियम वेगळा असेल. यासाठी "सुपर ओव्हर'चा अवलंब केला जाईल, पण त्यातही एक बदल करण्यात आला आहे. जोपर्यंत एक संघ दुसऱ्या संघापेक्षा अधिक धावा करत नाही, तोवर विजेता ठरणार नाही. त्यामुळे आता "सुपर ओव्हर'मध्येही सामना बरोबरीत सुटल्यास जोपर्यंत एक संघ दुसऱ्या संघापेक्षा अधिक धावा करत नाही, तोवर "सुपर ओव्हर' टाकल्या जाणार. 

"आयसीसी'च्या बैठकीत कार्यक्रमातही बदल करण्यात आला असून, तो 2023 पासून आठवर्षांचा करण्यात आला आहे. "आयसीसी'चे कार्याध्यक्ष शशांक मनोहर म्हणाले,""सर्व उपलब्ध पर्यायांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुरुष आणि महिलांच्या दरवर्षी होणाऱ्या स्पर्धेच्या कार्यक्रमात सातत्य राहिल. यामुळे द्विपक्षीय मालिकांनाही प्रोत्साहन मिळेल. क्रिकेटच्या प्रसारासही चालना मिळेल. त्याचबरोबर 2023 पासून आयसीसीच्या सर्व सदस्यांना "आयसीसी'च्या स्पर्धा घेण्याची समान संधी मिळेल.'' 

अन्य बदल 
- 2023 पासून "आयसीसी'च्या स्पर्धेसाठी आठ वर्षांचा कालावधी 
- यात पुरुष आणि महिलांच्या प्रत्येकी आठ स्पर्धा 
- नेपाळ, झिंबाब्वेवरील निलंबन मागे, पुन्हा सदस्यत्व बहाल 
- महिला क्रिकेटमधील पारितोषिक रकमेत वाढ 
- महिलांच्या 19 वर्षांखालील गटाचा नव्याने "आयसीसीसी' स्पर्धांत समावेश

loading image
go to top