बीसीसीआय बनली जगातील सर्वांत शक्तिशाली क्रिकेट संघटना

bcci
bcci

मुंबई : भारत हा एक क्रिकेटवेडा देश म्हणून ओळखला जातो. मोठ्या संख्येत असणारे क्रिकेटचे फॅन्स हे भारताइतके दुसऱ्या कोणत्याच देशात सापडणार नाहीत. याच्या जोरावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही जगातील सर्वात शक्तिशाली क्रिकेट संस्था बनली आहे. 

आता एवढ्या मोठ्या संख्येत क्रिकेट फॅन्स असणाऱ्या देशात तितकेच मोठे क्रिकेट स्टेडियम उभारले जात आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये उभारण्यात येणारे मोटेरा स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम ठरणार आहे. मोटेरा स्टेडियममध्ये एकाचवेळी तब्बल 1 लाख 10 हजार प्रेक्षक बसतील एवढी याची आसन क्षमता तयार करण्यात आली आहे.

याचबरोबर हे मोटेरा स्टेडियम सध्या जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडला (एमसीजी) मागे टाकेल. एमसीजीची आसनक्षमता 1 लाख 24 इतकी आहे. जानेवारी 2018 मध्ये मोटेरा स्टेडियमच्या उभारणीस प्रारंभ झाला असून सध्या याचे निम्म्याहून अधिक काम झाले आहे. यावर्षीच हे स्टेडियम बांधून पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) शनिवारी (ता.18) मोटेरा स्टेडियमचा एक फोटो ट्विटरवर अपलोड केला. अहमदाबादमध्ये उभारण्यात येत असलेल्या मोटेरा क्रिकेट स्टेडियमची एक झलक. स्टेडियम पूर्ण झाल्यावर यामध्ये 1 लाख 10 हजार क्रिकेट चाहते बसतील आणि ते जगातील सर्वात मोठे स्टेडियम असेल, असे कॅप्शन दिले आहे. 

गुजरात क्रिकेट असोसिएशन (जीसीए) च्या देखरेखेखाली मोटेरा स्टेडियमचे बांधकाम सुरू आहे. भव्यदिव्य अशा या मोटेरा स्टेडियममध्ये तांबड्या आणि काळ्या मातीपासून तयार केलेल्या तब्बल 11 खेळपट्ट्या असतील. आणि फिरकी आणि वेगवान अशा दोन्ही गोलंदाजांना अनुकूल अशी खेळपट्टी बनविण्यात येत असल्याची माहिती जीसीएचे अध्यक्ष धनराज नथवानी यांनी दिली. 

याबरोबरच, मोटेरा हे भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोलकातामधील ऐतिहासिक ईडन गार्डनलाही मागे टाकेल. ईडन गार्डन्सची आसन क्षमता 68 हजार एवढी आहे. ऑस्ट्रेलियातील एमसीजीनंतर ईडन गार्डन हे सध्या जगातील दुसरे मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून ओळखले जाते. त्यानंतर पर्थ स्टेडियम आणि हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाचा क्रमांक लागतो.

जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्टेडियम (मोटेरासहित) : 
1) मोटेरा क्रिकेट स्टेडियम, अहमदाबाद (भारत)
2) मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न (ऑस्ट्रेलिया)
3) ईडन गार्डन, कोलकाता (भारत)
4) पर्थ स्टेडियम, पर्थ (ऑस्ट्रेलिया)
5) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद (भारत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com