
T20 World Cup 2024 : ICCचा अमेरिकेला मोठा धक्का! 2024च्या टी-20 विश्वचषकाचे यजमानपद घेतले हिसकावून
T20 World Cup 2024 : T20 विश्वचषक 2024 संदर्भात एक मोठे अपडेट समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) या स्पर्धेच्या यजमानपदाची जबाबदारी दोन मोठ्या देशांना दिली होती. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार वेस्ट इंडिज आणि अमेरिका या स्पर्धेचे सह-होस्टिंग करणार होते. पण आता ICC ने अमेरिकेला मोठा धक्का देत 2024 च्या T20 वर्ल्ड कपचे यजमानपद हिसकावून घेतले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) गेल्या वर्षी अधिकृतपणे घोषणा केली होती. 2024 मध्ये होणारा टी-20 विश्वचषक संयुक्तपणे अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये आयोजित केला जाईल. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 चे सह-होस्टिंग हक्क अमेरिकेकडून काढून घेण्यात आले आहेत.
गेल्या वर्षी यूएसए आणि वेस्ट इंडिजने टी-20 विश्वचषकाच्या यजमानपदाचा हक्क मिळवला होता. अहवालानुसार, युनायटेड स्टेट्सचे सह-होस्टिंग अधिकार आता काढून घेण्यात आले आहेत. युनायटेड स्टेट्स क्रिकेट संस्थेकडून स्पष्टतेचा अभाव हे सह-यजमानपद काढून घेण्याचे मुख्य कारण आहे.
यजमानपदासह अमेरिकन क्रिकेट संघही या स्पर्धेसाठी थेट पात्र ठरला होता, परंतु आता हा संघ 2024 च्या टी20 विश्वचषकातून बाहेर फेकला जाण्याचा धोका आहे. अमेरिकन क्रिकेट संघ प्रथमच या स्पर्धेत सहभागी म्हणून पात्र ठरला आहे.
2021 आणि 2022 टी-20 विश्वचषकातील पहिल्या फेरीनंतर सुपर 12 टप्प्यांतर्गत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मात्र पुढील स्पर्धेत संघांची 2 ऐवजी 4 गटात विभागणी केली जाईल. तेथून पात्र ठरण्यासाठी प्रत्येक गटातील टॉप-2 संघांना सुपर-8 मध्ये स्थान दिले जाईल.
सुपर-8 मध्ये पुन्हा दोन गट तयार केले जातील ज्यामध्ये 4-4 संघ ठेवण्यात येतील आणि दोन्ही गटातील टॉप-2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. दोन्ही उपांत्य फेरीतील विजेत्या संघामध्ये अंतिम सामना खेळल्या जाईल.