ICC Ranking : टी 20 क्रमवारीत इशान किशनची तब्बल 68 अंकांची उडी

Ishan Kishan
Ishan Kishanesakal

दुबई : भारताचा टी 20 संघातील सलामीवीर इशान किशनने आयसीसी क्रमवारीत 68 अंकांची उडी घेतली आहे. आता तो आयसीसी टी 20 बॅटिंग रँकिंगमध्ये सातव्या स्थानावर पोहचला आहे. तर गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार आणि युझवेंद्र चहलने देखील आपली क्रमवारी सुधारली आहे. (ICC T20 Batting Ranking Ishan Kishan Only Indian Batter In Top 10)

Ishan Kishan
'भन्नाट' कामगिरीनंतर नीरज म्हणाला यापेक्षाही मोठ्या स्पर्धांवर माझे लक्ष!

इशान किशनने मायदेशात दक्षिण आफ्रिेकेविरूद्ध होत असलेल्या टी 20 मालिकेमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंतच्या तीन सामन्यात 164 धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकाचा समावेश आहे. या कामगिरीच्या जोरावर त्याने टी 20 बॅटिंग रँकिंगमध्ये टॉप टेनमध्ये जागा मिळवली. टॉप 10 मध्ये जागा मिळवणारा इशान किशन हा एकमेव भारतीय फलंदाज आहे. या यादीत केएल राहुल 14 व्या स्थानावर आहे. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमारने टी 20 बॉलिंग रँकिंगमध्ये सातवे तर युझवेंद्र चहलने 11 वे स्थान पटकावले आहे.

Ishan Kishan
VIDEO : 12 चेंडूत 60 धावा ठोकणाऱ्या मॅक्सवेलने थोपटली बॉलरची पाठ

वनडे रँकिंगचा विचार केला तर बॅटिंगमध्ये विराट कोहली तिसऱ्या तर रोहित शर्मा चौथ्या स्थानावर आहे. तर गोलंदाजीत टॉप टेनमध्ये फक्त जसप्रीत बुमराहच स्थान मिळवू शकला आहे. तो सध्या पाचव्या स्थानावर आहे. कसोटीत बॅटिंग रँकिंगमध्ये रोहित शर्मा आठव्या तर विराट कोहली 10 व्या स्थानावर आहे. गोलंदाजीत रविचंद्रन अश्विन दुसऱ्या तर जसप्रीत बुमराह तिसऱ्या स्थानावर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com