ICC Womens World Cup : स्नेह-पुजा फेमस; पाकची गोलंदाजी 'बेबस'

Pooja Vastrakar  Sneh Rana
Pooja Vastrakar Sneh Rana Sakal

ICC Womens World Cup 2022 Pakistan Women vs India Women : न्यूझीलंडच्या मैदानात सुरु असलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय महिला संघाने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने स्पर्धेला सुरुवात केलीये. सलामीच्या लढतीत सलामीची बॅटर स्मृती (Smriti Mandhana) आणि दिप्तीनं (Smriti Mandhana) संघाला चांगली सुरुवात करुन दिली. पण या दोघी तंबूत परतल्यानंतर भारतीय संघाची अवस्था बिकट झाली. कशी बशी शंभरी केलेल्या भारतीय महिला संघ 200 चा आकडा पार करतोय की नाही, असे वाटत होते. कारण कर्णधार मिताली राजसह (Mithali Raj) हरमनप्रित कौर (Harmanpreet Kaur)स्वस्तात माघारी परतल्या. रिचा घोषलाही नावाला साजेसा खेळ करता आला नाही. धावफलकावर 114 धावा असताना आघाडीच्या सहा विकेट्स पडल्या होत्या.

Pooja Vastrakar  Sneh Rana
आई कुठे काय करते? पाक कॅप्टन लेकीला कडेवर घेऊन आली मॅच खेळायला

पाकिस्तान विरुद्धच्या हायहोल्टेज सामन्यातून वर्ल्ड कप स्पर्धेतील आपला पहिला सामना खेळणाऱ्या स्नेह राणा (Sneh Rana) आणि पूजा वस्त्राकर (Pooja Vastrakar ) या दोघींनी संघाचा डाव सावरला. दोघींनी शतकी भागीदारी करुन भारतीय संघाला दबावातून बाहेर काढले. त्यांची ही खेळी खास अशीच आहे. गुडघ्याच्या दुखापतीतून सावरुन टीम इंडियात कमबॅक करणाऱ्या जोडीनं नुसता संघाचा डाव सावरला नाही तर पाकिस्तानसमोर तगडे आव्हान उभे करण्यात मोठा वाटा उचलला. दोघींसाठी ही पहिलीच वर्ल्ड कप स्पर्धा आहे. त्यात पाकिस्तान विरुद्धचा सामना म्हणजे डबल प्रेशर. कठीण परिस्थितीत दोघींनी लक्षवेधी कामगिरी करुन दाखवली. दोघींच्यामध्ये सिंगल डबल्स घेताना जो ताळमेळ दिसला तोही कमालीचा होता. दोघीही गुडघ्याच्या दुखापतीतून सावरुन मैदाना उभ्या राहिल्यात असं वाटतही नव्हत.

Pooja Vastrakar  Sneh Rana
VIDEO: स्मृतीचा पहिला हल्ला फसला, दुसऱ्या वेळी मात्र...

पुजा वस्त्राकरनं (Pooja Vastrakar ) 59 चेंडूत 67 धावांची दमदार खेळी केली. आपल्या या खेळीत तिने 8 खणखणीत चौकार मारले. अखेरच्या षटकात मोठी फटकेबाजी करण्याच्या नादात तिची विकेट पडली. याआधी तिने आपले काम फत्तेह केलं होते. तिने स्नेह राणाच्या मदतीने सातव्या विकेटसाठी 122 धावांची आश्वासक भागीदारी रचली. दुसऱ्या बाजूला स्नेह राणाने (Sneh Rana ) 48 चेंडूत 4 चौकाराच्या मदतीने नाबाद 53 धावा केल्या. तिच्याशिवाय स्मृती मानधना 52 (75) आणि दीप्ती शर्मा 40 (57) धावांचे योगदान दिले. या चौघींच्या खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने सलामीच्या सामन्यात निर्धारित 50 षटकात 7 बाद 244 धावा केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com