चेंडू-फळीच्या खेळात चायनीज मालाची दांडी
सौदी अरेबियाने चीनला 390 धावांनी हरवले. सौदी अरेबिया 50 षटकांत सर्वबाद 418, चीन 12.4 षटकांत सर्व बाद 28. चायनीज गोष्टी जास्त वेळ टिकत नाहीत, हेच खरे.
- रवींद्र जडेजा
लंडन - वर्ल्ड क्रिकेट लीगच्या विभागीय पात्रता स्पर्धेत सौदी अरेबियाविरुद्ध चीनचा संघ 28 धावांत गुंडाळला गेला आणि त्यांना 390 धावांनी हार पत्करावी लागली. चीनकडून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय लढतीतील नीचांकच नोंदवला गेला.
2004 च्या विश्वकरंडक स्पर्धेत श्रीलंकेने झिंबाब्वेला 35 धावांत गुंडाळले होते. त्यापेक्षा जास्त नीचांकाची नोंद झाली. अर्थात चीनकडून एकदिवसीय लढतीतील नीचांक नोंदला गेला नाही. बार्बाडोसने 2007 मध्ये विंडीजच्या 19 वर्षांखालील संघास 18 धावांत गुंडाळले होते. 419 धावांचे लक्ष्य असलेल्या चीनचा डाव 12.4 षटकात आटोपला. थायलंडमधील चिआंग माई येथे सुरू असलेली विभागीय स्पर्धा ही 2023 च्या विश्वकरंडक स्पर्धेची पहिली पात्रता स्पर्धा आहे. त्यात सौदी संभाव्य विजेते मानले जात आहेत. त्यात बहारिन, थायलंड, कुवेत व कतारचाही सहभाग आहे. महम्मद अफझलने 91 चेंडूंत शतक आणि शाहबाज रशीदने अर्धशतक करत सौदी डावास जोरदार सुरवात केली. त्यांचा कर्णधार शोएब अली याने 41 चेंडूंत 91 धावा केल्या. इब्रार उल हसन याने आठ धावांत तीन, लेग स्पिनर इमरान आरिफ याने दोन धावांत तीन फलंदाज बाद केले. ऑफ स्पिनर शाहबाज रशीदने हॅटट्रिक करत चिनी डाव संपवला.
"चिनी कम'...
- सौदी अरेबियाच्या 50 षटकांत 418 धावा
- चीनच्या डावात सर्वाधिक 13 धावा अवांतरच्या
- सात चिनी फलंदाज शून्यावर बाद
- सौदीच्या शाहबाज रशीदची चार चेंडूंत चार विकेट घेण्याची संधी चीनचा एक फलंदाज जखमी असल्यामुळे हुकली
- चीनच्या फेंग यू याने 89 धावांत निम्मा संघ बाद केला
सौदी अरेबियाने चीनला 390 धावांनी हरवले. सौदी अरेबिया 50 षटकांत सर्वबाद 418, चीन 12.4 षटकांत सर्व बाद 28. चायनीज गोष्टी जास्त वेळ टिकत नाहीत, हेच खरे.
- रवींद्र जडेजा