India All Time Test XI : किंग कोहली 'वॉटर बॉय',द्रविड कॅप्टन

Virat Kohli
Virat KohliSakal

मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्याकडे आधुनिक क्रिकेट जगतातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून पाहिले जाते. त्यामुळे कोणतीही प्लेइंग इलेव्हन त्याच्याशिवाय अधूरीच वाटते. पण आईसलँड क्रिकेट बोर्डानं (Iceland Cricket) किंग कोहलीला वॉटर बॉयची जागा दिलीये. या क्रिकेट बोर्डाने भारताची ऑल टाइम टेस्ट इलेव्हन (All Time Test XI India) जाहीर केलीय. यात विराट कोहलीला त्यांनी बारावा खेळाडू म्हणून निवडलं आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन यादी जाहीर केल्यावर भारतीय नेटकरी त्यांना ट्रोल करताना दिसते. (Iceland Cricket Troll pick Virat Kohli as 12th man in Indias all time Test XI)

Virat Kohli
RCB फिमेल फॅनच्या पालकांची अमित मिश्राला का वाटते चिंता?

आईसलँड क्रिकेट नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रिकेसंदर्भात मजेदार कमेंट्स करताना दिसते. त्याला चांगली पसंतीही मिळते. पण 13 एप्रिलला त्यांनी केलेले ट्विट भारतीयांना चांगलेच खटकलं आहे. भारतीय क्रिकेट चाहते त्यांच्या ट्विटवर उघडपणे नाराजी व्यक्त करताना दिसते. विराट कोहलीला बारावा खेळाडू आणि संघात कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी असताना कॅप्टन्सी मात्र द्रविडकडे दिल्याचे गोष्ट चाहत्यांना पटलेली नाही.

Virat Kohli
शाहबाज शरीफ पंतप्रधान झाले, शाहिद आफ्रिदी 'ट्रोल' झाला

आईसलँड क्रिकेट बोर्डाने भारताची जी सर्वकालीन सर्वश्रेष्ठ टीम निवडलीये त्यात लिटल मास्टर गावसकर आणि माजी स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग या जोडीला सलामीवीर म्हणून पसंती दिलीये. राहुल द्रविडकडे या संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. सचिन तेंडुलकर, विजय हजारे, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), कपिल देव, आर अश्विन, कुंबळे, जवागल श्रीनाथ आणि जसप्रीत बुमराह हे खेळाडू प्लेइंग इलेव्हनचा भाग आहेत. विराट कोहली बारावा खेळाडू आहे. चंद्रशेखर, जडेजा, जहीर खान, लक्ष्मण आणि हरभजन यांना अनुक्रमे 13 ते 17 असा नंबर देण्यात आलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com