अंबाजोगाई जिल्ह्याची मागणी करणाऱ्या व्यक्तीची 'ही' आहे ओळख!

प्रशांत बर्दापूरकर
सोमवार, 15 जुलै 2019

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडमधील लॉर्डस स्टेडियममध्ये अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे अशा घोषणा देणारे ते ग्रहस्त अंबाजोगाईतील डॉ. आदित्य पतकराव आहेत.
 

अंबाजोगाई : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडमधील लॉर्डस स्टेडियममध्ये अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे अशा घोषणा देणारे ते ग्रहस्त अंबाजोगाईतील डॉ. आदित्य पतकराव आहेत.

ते पुण्यातील प्रसिद्ध दंत चिकित्सक असून रविवारी लंडनमध्ये पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेले होते. हा पुरस्कार सोहळा संपल्यावर त्यांनी लॉर्ड्सच्या मैदानावर क्रिकेट सामन्याचा आनंद घेतला.

World Cup 2019 : लॉर्ड्सवर तो ओरडतोय अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे

अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे अशा घोषणाची क्लिप सबंध देशात सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. परंतू या सामन्यावेळी इंग्लड व न्यूझीलंडचे चाहते आपापल्या देशाला पाठिंबा देत घोषणा देत होते. त्याचवेळी अंबाजोगाईकर डॉ. आदित्य पतकराव हे अंबाजोगाई जिल्ह्याची होण्यासाठी आपला जिव्हाळा व प्रेम व्यक्त करत, 'अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे' अशा घोषणा देत होते. त्यांचा व्हिडिओ करणारा (बहुदा त्यांचा मित्रच असावा) लवकरच होणार असा प्रतिसाद देत होता. 

हा व्हिडिओ पाहुन सत्यता जाणुन घेण्याचा प्रयत्न केला असता, डॉ. आदित्य पतकराव हे लंडनमध्ये त्यांना जाहिर झालेला इंटरनॅशनल अक्सिलन्स पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेले होते. अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: identity of the person demanding the district of Ambajogai