दुखापत आणि चित्रपटामुळे कुस्तीकडे दुर्लक्ष - गीता

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

विजयानगर - सततची दुखापत आणि चित्रपटामुळे आपल्या कारकिर्दीवर परिणाम झाल्याचे मान्य करून अनुभवी महिला कुस्तीगीर गीता फोगट हिने आता आपण पुन्हा कुस्तीवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहोत. 

राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकविजेत्या गीता आणि बबिता फोगट भगिनी त्यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या ‘दंगल’ या चित्रपटामुळे एका क्षणात लोकप्रियतेच्या कळसावर पोचल्या. राष्ट्रकुल पदकाने जेवढी ओळख त्यांनी दिली नाही, त्याहून अधिक ओळख त्यांना या एका चित्रपटाने दिली. पण याच नादात त्यांचे कुस्तीवरील लक्ष कमी झाले. गीताने हे मान्यदेखील केले.

ती म्हणाली, ‘‘आधी दुखापत आणि नंतर चित्रपट यामुळे दोन वर्षे कुस्तीपासून दूर रहावे लागले. कुस्तीकडे माझे दुर्लक्षच झाले होते. आता मात्र फक्त कुस्ती आणि कुस्तीकडेच आपण लक्ष देणार आहोत.’’

ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेली गीता ही पहिली भारतीय महिला कुस्तीगीर होती. या वेळी आशियाई स्पर्धेतही खेळण्याचा तीचा मानस होता. मात्र, राष्ट्रीय शिबिरात उपस्थित न राहिल्याबद्दल तिला संघातून वगळण्यात आले. 

गीता म्हणाली, ‘‘एकदा का तुम्ही संघापासून दूर गेलात की पुनरागमन करणे कठिण असते. येथे मी तर कुस्तीपासूनच दूर गेले होते. खेळ आता इतका सोपा राहिलेला नाही. अनेक जण संधीची वाट पहात उभे आहेत. मलादेखील शून्यातून सुरवात करावी लागेल.’’

गीता म्हणते...
आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघाची तयारी चांगली
महिला कुस्तीगीर गेल्या आशियाई स्पर्धेपेक्षा अधिक पदके मिळवतील. 
विनेश, साक्षी आणि पूजा यांच्याकडून मला खात्री
बजरंग नक्कीच सुवर्णपदक मिळवेल याची खात्री
सुशील फॉर्ममध्ये नाही. पण, एका अपयशाने तुम्ही त्याच्या अनुभवाला आव्हान देऊ शकत नाही
‘दंगल’ चित्रपटानंतर मुलींमध्ये कुस्ती खेळायची इच्छा वाढीस लागली. साक्षीच्या ऑलिंपिक पदकाने त्यांना अधिक विश्‍वास दिला.

Web Title: Ignore wrestling due to injury and film says geeta