esakal | वाढत्या कोरोनामुळे मुंबईची सर्वात मोठी संधी हुकणार? वाचा सविस्तर...  
sakal

बोलून बातमी शोधा

ipl mumbai

कोरोनाच्या आक्रमणामुळे अनिश्‍चित असलेली आयपीएल घेण्यासाठी भारतीय क्रिकेट मंडळाचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत; पण मुंबईत सतत वाढत असलेल्या कोरोना रुग्णामुळे आयपीएल संयोजकांचा महत्त्वाचा एक शहरी स्पर्धेचा फॉर्म्युलाच संकटात आला आहे.  

वाढत्या कोरोनामुळे मुंबईची सर्वात मोठी संधी हुकणार? वाचा सविस्तर...  

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई ः कोरोनाच्या आक्रमणामुळे अनिश्‍चित असलेली आयपीएल घेण्यासाठी भारतीय क्रिकेट मंडळाचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत; पण मुंबईत सतत वाढत असलेल्या कोरोना रुग्णामुळे आयपीएल संयोजकांचा महत्त्वाचा एक शहरी स्पर्धेचा फॉर्म्युलाच संकटात आला आहे.  

वाचा ः नाल्यांचे बळी थांबेनात; प्रशासनाचे दुर्लक्ष चिमुकल्यांसाठी ठरतायत घातक​

भारतीय क्रिकेट मंडळ सप्टेंबर-ऑक्‍टोबर अथवा ऑक्‍टोबर-नोव्हेंबर कालावधीत आयपीएल घेण्याचा विचार करीत होते. त्यासाठी आयपीएलमधील परदेशी खेळाडूंचे पंधरा दिवसांचे विलगीकरण करून स्पर्धा घेण्याचा विचार होता. त्याचबरोबर भारतातील प्रवासही कमी केल्यास स्पर्धेस हिरवा कंदील मिळू शकेल, असा विचार झाला होता. हा प्रस्ताव फ्रॅंचाईजनाही मान्य असल्याचे सांगितले जात आहे. 

वाचा ः वाफेघर ग्रामस्थांच्या एकीमुळे गाव उजळले; जनसहभागातून महावितरणच्या कामाला वेग...

मुंबईत वानखेडे स्टेडियम तसेच सीसीआय यांच्यासह नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमही आहे. याशिवाय पुण्यातील गहुंजे स्टेडियमही फार दूर नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या चारही स्टेडियमवर आयपीएलचे सामने आयोजित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर मुंबईत पंचतारांकित हॉटेलची वानवा नाही. मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. त्यामुळे परदेशी खेळाडू थेट मुंबईत येण्यासही काही प्रश्न येणार नाहीत. मात्र मुंबई तसेच आजूबाजूच्या परिसरातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने मुंबईतच आयपीएलमधील लढती घेण्याचा विचार सध्या तरी मागे पडला आहे. 

वाचा ः क्रीडाविश्वासाठी आशेचा किरण; कोरोनाच्या संकटातही युरोपातील 'ही' प्रतिष्ठेची फुटबॉल लीग पार पडली.. वाचा सविस्तर...

परदेशी खेळाडू जैवसुरक्षेचे सर्व नियम पाळण्यास तयार आहेत. त्याचबरोबर आयपीएलचे सुरक्षित संयोजन करण्यासाठी आम्हीही नियमावली तयार करीत आहोत. सरकारची मंजुरी आवश्‍यकच असेल; मात्र मुंबईतील वाढत्या रुग्णांनी आमचे लीग घेण्याचे आव्हान जास्त खडतर केले आहे, असे भारतीय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

वाचा ः आयुषमान खुराना म्हणाला, अखेर माझे स्वप्न पूर्ण झाले...

एक शहरी फॉर्म्युल्याबाबत बंगळूरचा विचार 
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आयपीएलचे फक्त मुंबईत संयोजन शक्‍य होणार नसले, तरी एक शहरी फॉर्म्युला अजून भारतीय मंडळाने पूर्णपणे सोडलेला नाही. बंगळूरचा विचार सुरू झाला आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत बंगळूरमध्ये पावसाचा फारसा धोका नसतो. त्याचबरोबर बंगळूर शहरातील चिन्नास्वामी स्टेडियमसह शहराबाहेरील स्टेडियमचाही वापर करता येऊ शकेल. या मैदानावर स्टॅंड नाहीत; मात्र लढती प्रेक्षकांविना होणार नसल्यामुळे तो प्रश्न नाही. त्याच वेळी या स्टेडियमवरील सुविधाही चांगल्या आहेत असेही सांगितले जात आहे. स्टेडियम बंगळूरबाहेर आहेत. त्यामुळे खेळाडूंच्या प्रवासाचा प्रश्न असेल, त्याचबरोबर बंगळूरमध्येही आठ संघांच्या मुक्कामासाठी पंचतारांकित हॉटेलचाही प्रश्न नसेल, असे सांगितले जात आहे. 

वाचा ः स्थलांतरीत कामगारांचे मुंबईत परतण्यासाठी मालकांना साकडे; वाचा बातमी

श्रीलंका, अमिरातीचा पर्यायही विचारात 
भारतीय क्रिकेट मंडळाने आयपीएलबाबत विविध पर्यायांचा विचार सुरू केला आहे. त्यानुसार परदेशात लीग घेण्याचा पर्यायही खुला ठेवला आहे. श्रीलंका तसेच संयुक्त अरब अमिरातीने स्पर्धा घेण्याची तयारी दाखवली आहे. आमची पहिली पसंती भारतात स्पर्धा घेण्यासच जास्त असेल. मात्र परदेशात लीग घेण्याविषयी नक्कीच विचार होईल, असेही त्यांनी सांगितले.