
IND vs AUS 1st ODI Live: अडचणीत राहुलचे अर्धशतक! कसोटीपाठोपाठ ODI सामन्यातही ऑस्ट्रेलियाला लोळवलं
India vs Australia 1st ODI Updates : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा थरार आजपासून रंगणार आहे. मुंबईतील वानखेडेवर खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच गडी राखून पराभव केला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघ 35.4 षटकांत 188 धावांवर गारद झाला.
प्रत्युत्तरात भारताने 39.5 षटकांत पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. केएल राहुल लयीत परतला आणि त्याने चांगली फलंदाजी करताना 91 चेंडूत 75 धावांची नाबाद खेळी केली. त्याच्याशिवाय रवींद्र जडेजाही 45 धावा करून नाबाद राहिला. दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी 108 धावांची नाबाद भागीदारी झाली. या विजयासह भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
राहुलने ठोकले अर्धशतक
केएल राहुलने 74 चेंडूत अर्धशतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील 13 वे अर्धशतक होते. सध्या राहुल 75 चेंडूत 54 धावा करून क्रीजवर असून रवींद्र जडेजा 32 धावांवर खेळत आहे. भारताची धावसंख्या 35 षटकांनंतर 5 बाद 150 आहे. टीम इंडियाला अजून 39 धावांची गरज आहे.
टीम इंडिया मोठ्या संकटात! कर्णधार हार्दिक पांड्यासह अर्धा संघ तंबूत
भारताला 20 व्या षटकात 83 धावांवर पाचवा धक्का बसला आहे. मार्कस स्टॉइनिसने हार्दिक पांड्याला कॅमेरून ग्रीनकडे झेलबाद केले. हार्दिक 31 चेंडूत 25 धावा करून बाद झाला. त्याने केएल राहुलसोबत पाचव्या विकेटसाठी 55 चेंडूत 44 धावांची भागीदारी केली. 20 षटकांनंतर भारताची धावसंख्या 5 बाद 83 अशी आहे.
टीम इंडिया मोठ्या संकटात! 50 धावांत 4 विकेट
भारताच्या धावसंख्येने चार विकेट गमावून 50 धावा केल्या आहेत. लोकेश राहुल आणि हार्दिक पंड्या क्रीजवर आहेत. टीम इंडियाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी हीच जोडी असेल.
भारताची चौथी विकेट पडली
39 धावांवर भारताची चौथी विकेट पडली. शुभमन गिल 31 चेंडूत 20 धावा करून बाद झाला. स्टार्कच्या चेंडूवर मार्नस लबुशेनने त्याचा झेल टिपला. गिलने आपल्या खेळीत तीन चौकार मारले. या सामन्यातील मिचेल स्टार्कचे हे तिसरे यश आहे. 11 षटकांनंतर भारताची धावसंख्या चार विकेट गमावून 43 आहे.
वानखेडे स्टेडियममध्ये सन्नाटा! सलग दोन चेंडूंवर कोहली-सूर्या तंबूत
भारताला 16 धावांच्या स्कोअरवर तिसरा धक्का बसला. मिचेल स्टार्कच्या स्विंग होणाऱ्या चेंडूंना भारतीय फलंदाजांकडे उत्तर नाही. विराट कोहलीपाठोपाठ सूर्यकुमार यादवही बाद झाला आहे. स्टार्कनेही त्याला विकेट्ससमोर पायचीत केले. त्याला खातेही उघडता आले नाही.
भारताला मोठा धक्का!
16 धावांच्या स्कोअरवर भारताला मोठा धक्का बसला. नऊ चेंडूत चार धावा करून विराट कोहली मिचेल स्टार्कचा बळी ठरला आहे. स्टार्कने त्याला विकेट्ससमोर पायचीत केले. 16 धावांत दोन गडी गमावल्यानंतर भारतीय संघ अडचणीत सापडला आहे.
पाच धावांवर टीम इंडियाला पहिला धक्का! ईशान किशन तंबूत
189 धावांचा पाठलाग करताना भारताची पहिली विकेट पाच धावांवर पडली आहे. ईशान किशन तीन धावा करून बाद झाला. त्याने आठ चेंडूंत तीन धावा केल्या. मार्कस स्टॉइनिसने त्याला विकेट्ससमोर पायचीत केले.
IND vs AUS 1st ODI Live: शमी-सिराजचा कहर! ऑस्ट्रेलियन संघ 188 धावांवर गारद
ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 189 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. कांगारूंचा संघ 35.4 षटकांत 188 धावांत गारद झाला. एकवेळ ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 2 बाद 129 अशी होती, त्यानंतर संघाने 59 धावा करताना आठ विकेट गमावल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाने 19.3 षटकांत 2 बाद 129 धावा केल्या होत्या. मिचेल मार्श आणि मार्नस लबुशेन क्रीजवर होते. रवींद्र जडेजाने मार्शला बाद केले आणि त्यानंतर संपूर्ण संघ 35.4 षटकांत गडगडला.
म्हणजेच 17 षटकांत भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव संपवला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 65 चेंडूत 81 धावांची खेळी खेळली. याशिवाय एकही फलंदाज चालला नाही. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.
टीम इंडियाच्या गोलंदाजाचा कहर! ऑस्ट्रेलियाला नववा धक्का
ऑस्ट्रेलियाला 34व्या षटकात नववा धक्का बसला आहे. मोहम्मद सिराजने शॉन अॅबॉटला स्लिपमध्ये शुभमन गिलकरवी झेलबाद केले. सध्या मिचेल स्टार्क आणि अॅडम झाम्पा क्रीजवर आहेत.
ऑस्ट्रेलियाला आठ धक्का
33 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाने 8 विकेट गमावून 188 धावा केल्या आहेत. 33 व्या षटकात रवींद्र जडेजाने ग्लेन मॅक्सवेलला हार्दिक पांड्याकरवी झेलबाद केले. मॅक्सवेलला आठ धावा करता आल्या. सध्या शॉन अॅबॉट आणि मिचेल स्टार्क क्रीजवर आहेत.
मुंबईत मोहम्मद शमीचा धुमाकूळ! तीन षटकांत तीन विकेट अन्...
मोहम्मद शमी या सामन्यात धुमाकूळ घालत आहे. त्याने तीन षटकांत तीन बळी घेतले आहेत. डावाच्या 28व्या षटकात जोस इंग्लिसला बाद केल्यानंतर शमीने 30व्या षटकात कॅमेरून ग्रीनलाही क्लीन बोल्ड केले. इंग्लिश 26 तर ग्रीनला 12 धावा करता आल्या. 30 व्या षटकात शमीला आणखी एक विकेट घेण्याची संधी होती, परंतु शुभमन गिलने स्लिपमध्ये मार्कस स्टॉइनिसचा झेल सोडला. त्यानंतर स्टॉइनिसला खातेही उघडता आले नाही.
मात्र, स्टॉइनिसला या लाईफलाइनचा फारसा फायदा करता आला नाही आणि 32व्या षटकात शमीने त्याला स्लिपमध्ये शुभमनच्या हाती झेलबाद केले. 32 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या सात गड्यांच्या मोबदल्यात 184 अशी आहे.
मुंबईत मोहम्मद शमीचा कहर! इंग्लिश पाठोपाठ ग्रीनचा ही उडवला त्रिफळा
मुंबईत मोहम्मद शमी चांगलाच धुमाकूळ घालत आहे. जोस इंग्लिसला बाद केल्यानंतर शमीने कॅमेरून ग्रीनलाही क्लीन बोल्ड केले. ग्रीनला 19 चेंडूत 12 धावा करता आल्या. या षटकात शमीला आणखी एक विकेट घेण्याची संधी होती, पण शुभमन गिलने स्लिपमध्ये मार्कस स्टॉइनिसचा झेल सोडला. त्यानंतर स्टॉइनिसला खातेही उघडता आले नाही. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 30 षटकांनंतर 6 बाद 174 अशी आहे.
ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का
ऑस्ट्रेलियाला 28व्या षटकात 169 धावांवर पाचवा धक्का बसला. मोहम्मद शमीने जोस इंग्लिसला बोल्ड केले. चेंडू इंग्लिशच्या बॅटला लागून विकेटला लागला. इंग्लिशला 27 चेंडूत 26 धावा करता आल्या.
ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का! जडेजाने अप्रतिम झेल घेत लबुशेनला पाठवले पॅव्हेलियनमध्ये
ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का बसला आहे.139 धावांच्या स्कोअरवर विकेट पडली . रवींद्र जडेजाने कुलदीप यादवच्या चेंडूवर मार्नस लॅबुशेनकडे शानदार झेल टिपला. लबुशेनने 22 चेंडूत 15 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांनी आता ऑस्ट्रेलियन संघाला बॅकफूटवर ढकलले आहे.
मार्शचा तडाखा अखेर थांबला! 10 चौकार 5 षटकार अन् ठोकल्या 81 धावा
129 धावांवर ऑस्ट्रेलियाची तिसरी विकेट पडली आहे. मिचेल मार्श 65 चेंडूत 81 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार आणि पाच षटकार मारले. रवींद्र जडेजाचा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो मोहम्मद सिराजच्या हाती झेल देऊन बाद झाला.
कर्णधार पांड्याने काढला कर्णधारचा काटा
ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का बसला आहे. हार्दिक पंड्याने स्टीव्ह स्मिथला बाद केले. स्मिथने 30 चेंडूत 22 धावा केल्या. स्मिथ आणि मार्शची भागीदारी धोकादायक वाटत होती, पण कर्णधार हार्दिकने योग्य वेळी भारताला विकेट मिळवून दिली.
पहिल्या आठ षटकात 10 चौकार अन्... ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 50 पार
पहिल्या आठ षटकात 10 चौकार मारत ऑस्ट्रेलियाने एक विकेट गमावून 50 धावा केल्या आहे. स्टीव्ह स्मिथ आणि मिचेल मार्श यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळला आहे. आता या दोघांमध्ये चांगली भागीदारी झाली असून दोन्ही फलंदाजांना मोठी खेळी खेळून ऑस्ट्रेलियाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेणे आवडेल.
दहा मिनिटाच्या आत कांगारू संघाला मोहम्मद सिराजने दिला पहिला धक्का
पाच धावांवर ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट पडली. सामना सुरू होऊन फक्त दहा झाले होते आणि मोहम्मद सिराजने कांगारू संघाला पहिला धक्का दिला. ट्रॅव्हिस हेड 10 चेंडूत पाच धावा करून बाद झाला. मोहम्मद सिराजचा चेंडू त्याच्या बॅटच्या आतील काठाला लागून स्टंपवर गेला आणि भारताला पहिली विकेट मिळाली. दोन षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या एका विकेटवर पाच धावा आहे.
भारतीय संघाचे प्लेइंग इलेव्हन
शुभमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या (कर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.
कॅप्टन हार्दिक पांड्याने जिंकले नाणेफेक घेतला हा निर्णय! संघात मोठा बदल
भारताने नाणेफेक जिंकून कर्णधार हार्दिक पंड्याने ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे.
IND vs AUS : बदल तर होणारच... पहिल्या ODI सामन्यात कॅप्टन हार्दिक पांड्याने घेतला मोठा निर्णय
स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करेल. कॅप्टन हार्दिक पांड्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत काही मोठे निर्णय घेऊ शकतो.
कॅप्टन हार्दिक पांड्या प्लेइंग इलेव्हन मध्ये काय करू शकतो बदल इथे क्लिक करा आणि थोडक्यात जाणून घ्या