IND vs AUS: नागपूरच्या खेळपट्टीवर ओतले पाणी अन् कांगारूंचा झाला तिळपापड, जाणून घ्या नेमकं काय घडलं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 IND vs AUS 1st Test Australia Forced to Cancel Practice on Nagpur Pitch After Watering of Track staff-ruining-practice cricket news

IND vs AUS: नागपूरच्या खेळपट्टीवर ओतले पाणी अन् कांगारूंचा झाला तिळपापड, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

Ind vs Aus 2nd Test : नागपूर कसोटी संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाचा वेगळ्या पातळीवर सराव करण्याची योजना होती, पण मैदानाच्या कर्मचाऱ्यांमुळे ती कोलमडली. त्यामुळे ऑस्ट्रेलियन मीडियात भूकंप झाला. एका वृत्तानुसार ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाने वापरलेल्या नागपूर ट्रॅकवर विशेष प्रशिक्षण सत्र आयोजित करण्याची योजना आखली होती.

नागपूर कसोटी सामना अवघ्या तीन दिवसांत संपला. अशा स्थितीत दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी नागपूरच्या चौथ्या आणि पाचव्या दिवसाच्या खेळपट्टीवर सराव करून ऑस्ट्रेलियन संघाला स्वत:ला मजबूत करायचे होते.

ऑस्ट्रेलियाच्या योजनेनुसार गोष्टी घडल्या नाहीत कारण सामना संपल्यानंतर काही तासांनी मैदानाच्या कर्मचाऱ्यांनी खेळपट्टीला पाणी ओतले. वृत्तांवर विश्वास ठेवला तर ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाने व्हीसीए ग्राउंड स्टाफला आधीच सांगितले होते की ते नागपूर ट्रॅकवर सराव करणार आहे, परंतु शनिवारी रात्री ऑस्ट्रेलियन संघ मैदान सोडल्यानंतर ग्राउंड स्टाफने सेंटर विकेटवर पाणी ओतले.

ऑस्ट्रेलियाने रविवारी दुपारी स्टेडियमवर जाण्यासाठी संघातील पाच खेळाडूंसह सत्राची योजना आखली होती, परंतु खेळपट्टीवर पाणी होते. चार सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया 0-1 ने पिछाडीवर आहे. दुसरा कसोटी सामना 17 फेब्रुवारीपासून नवी दिल्लीत खेळल्या जाणार आहे. पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने एक डाव आणि 132 धावांनी गमावला होता.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला बॉर्डर-गावसकर सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची गरज आहे. या मालिकेत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला मोठ्या फरकाने हरवले तर डब्ल्यूटीसी फायनल खेळण्याचा निर्णय होईल.