IND vs AUS : 'बाबा रे दोन गोल्डन डक! तूझ्याकडून हे अपेक्षित नव्हती!', सूर्या T20 मध्ये हिट पण ODI फ्लॉप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ind vs aus 2nd odi-odi-suryakumar-yadav-2-consecutive-golden-duck Mitchell Starc for the second time in a row

IND vs AUS : 'बाबा रे दोन गोल्डन डक! तूझ्याकडून हे अपेक्षित नव्हती!', सूर्या T20 मध्ये हिट पण ODI फ्लॉप

India vs Australia ODI Suryakumar Yadav : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवीन मिस्टर 360 डिग्री म्हणून प्रसिद्ध झालेला भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेत मुंबईपाठोपाठ विशाखापट्टणममध्येही फ्लॉप झाला.

विशेष म्हणजे दोन्ही वेळा सूर्याला खातेही उघडता आले नाही. या दोन्ही सामन्यात तो गोल्डन डकचा बळी ठरला. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर दोन्ही सामन्यात मिचेल स्टार्कने सूर्यकुमार यादवला पायचीत केले. अशा स्थितीत टी-20मधील नंबर-1 फलंदाज सूर्यकुमार यादवच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ग्रहण लागलेले दिसते.

सूर्यकुमार यादव सध्या वनडे मालिकेत पहिल्या स्थानावर आहे. श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे त्याला वन सीरिजमध्ये नियमित संधी दिली जात आहे. मात्र, त्याच्या वनडेतील कामगिरीवर नजर टाकल्यास त्याला 22 सामन्यांत 25.47 च्या सरासरीने केवळ 433 धावा करता आल्या आहेत. त्याच्या वनडे कारकिर्दीत फक्त दोनच अर्धशतके आहेत. अशा स्थितीत दोन बॅक टू बॅक मॅचेसमध्ये गोल्डन डकचे बळी ठरल्यानंतर चाहत्यांच्या निशाण्यावर येणार हे निश्चित होते.

यावेळी सोशल मीडियावर सूर्यकुमार यादव यांची बरीच खेचली जात आहे. एबी डिव्हिलियर्सच्या तुलनेत काही चाहते ट्रोलही करत आहेत. आगामी 50 षटकांच्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ व्यवस्थापनाला मधल्या फळीत स्फोटक फलंदाज म्हणून सूर्यकुमार यादवचा प्रयत्न करायचा आहे.

त्यामुळेच टी-20 मध्ये यश मिळवल्यानंतर त्याला सतत संधी दिली जात आहे. सूर्या आतापर्यंत या फॉरमॅटमध्ये फ्लॉप ठरला आहे. इतकेच नाही तर सूर्याला कसोटी क्रिकेटमध्ये मिळालेल्या संधीचा फायदा उठवता आला नाही.