
IND vs AUS : कर्णधार रोहित शर्मा येतात टीम इंडियातून दोन दिग्गज खेळाडूंची हकालपट्टी
India vs Australia 2nd ODI : टीम इंडियाचा आत्मविश्वास यावेळी सातव्या गगनावर आहे. पहिला एकदिवसीय सामना जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आज विशाखापट्टणम येथे दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. आता हा सामना जिंकून मालिकेवर कब्जा करण्याची त्याच्याकडे सुवर्णसंधी आहे.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कांगारूंचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले आहेत. ग्लेन मॅक्सवेल आणि जोश इंग्लिस यांना वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी अॅलेक्स कॅरी आणि नॅथन एलिसचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे.
त्याचबरोबर भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले आहेत. इशान किशन आणि शार्दुल ठाकूर यांना वगळण्यात आले आहे. रोहित आणि अक्षर पटेल यांचे संघात पुनरागमन झाले आहे.
दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.
ऑस्ट्रेलिया : ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (क), मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, नॅथन एलिस, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा.