
IND vs AUS : अजूनही अश्विनच्या 'मंकडिंग'ची भिती? शेवटी घाबरून लाबुशेन स्टंपच्या...
Ind vs Aus 2nd Test : दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळल्या जात आहे. भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनने नेहमीप्रमाणे यावेळीही ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अडचणीत आणले आहे. अश्विन त्याच्या मंकडिंगसाठी देखील ओळखला जातो. ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडू मार्नस लॅबुशेन अश्विनला घाबरला.
ही घटना ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या 19व्या षटकात घडली जेव्हा आर अश्विन गोलंदाजी करताना अचानक थांबला. अश्विनने चेंडू टाकण्यापूर्वीच मार्नस लबुशेन क्रीज सोडताना दिसला. मार्नस लाबुशेनला इशारा देण्यासाठी अश्विनने हे केले असे ठामपणे सांगता येणार नाही, परंतु या अप्रत्यक्ष मार्नस लबुशेन यांची प्रतिक्रियाही दिसून आली. पुढच्या चेंडूवर नॉन-स्ट्रायकरच्या टोकावर असलेला मार्नस लॅबुशेन स्टंपच्या मागे उभा दिसला.
दुसरीकडे सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचा पहिला डाव 263 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने सर्वाधिक 81 धावा केल्या तर पीटर हँड्सकॉम्बने नाबाद 72 धावा केल्या.
टीम इंडियाकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 तर अश्विन आणि जडेजाने 3-3 विकेट घेतल्या. सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयस अय्यरचा टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाने एकही विकेट न गमावता 21 धावा केल्या आहेत.