
हार्दिक पांड्यानेही ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. 13व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने स्टीव्ह स्मिथला बाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. स्मिथनंतर डेव्हिड वॉर्नर फलंदाजीला आला आहे.
IND vs AUS : रोमांचक सामन्यात कांगारूंने टीम इंडियाला चारली धुळ! ऑस्ट्रेलियाने वनडे मालिका 2-1 ने जिंकली
India vs Australia 3rd ODI Cricket Score : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे मालिकेतील तिसरा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 270 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही फलंदाजी क्षीण झाली आणि 49.1 षटकात 248 धावांवर सर्वबाद झाले. ऑस्ट्रेलियाने तिसरी वनडे 21 धावांनी जिंकून मालिका 2-1 ने जिंकली.
सामना रोमांचक टीम इंडिया पराभवाच्या उंबरठ्यावर! पांड्यानंतर जडेजाही आऊट
225 धावांच्या स्कोअरवर भारताची आठवी विकेट पडली आहे. अॅडम झाम्पाने रवींद्र जडेजाला 18 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवून संघाचा विजय निश्चित केला. जडेजाने 33 चेंडूत 18 धावा केल्या. आता कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी क्रीजवर आहेत. भारताच्या विजयाच्या आशा संपल्या आहेत.
सामना रोमांचक मोडवर! भारताला सातवा धक्का! हार्दिक पांड्या आऊट
218 धावांच्या स्कोअरवर भारताची सातवी विकेट पडली आहे. हार्दिक पांड्या 40 चेंडूत 40 धावा करून बाद झाला आहे. आता रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव क्रीजवर आहेत.
भारताला दोन मोठे धक्के! सलग तिसऱ्या सामन्यात सूर्या 'गोल्डन डक'वर आऊट
भारताला दोन मोठे धक्के बसले आहे. विराट कोहलीच्या रूपाने भारताला पाचवा धक्का बसला. कोहलीने 72 चेंडूत 54 धावा केल्या. अॅश्टन अगरने झेलबाद केले. कोहलीने आपल्या खेळीत दोन चौकार आणि एक षटकार लगावला.
त्यानंतर या सामन्यातही सूर्यकुमार यादव पहिल्याच चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला. या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये त्याला खातेही उघडण्यात अपयश आले आहे. अॅश्टन आगरने त्याला क्लीन बोल्ड केले. त्याने सलग दोन चेंडूंत विकेट घेत भारतीय संघाला बॅकफूटवर आणले आहे.
विराट कोहलीने भारतीय डाव सांभाळला अन् ठोकले अर्धशतक
विराट कोहलीचे अर्धशतक पूर्ण झाले आहे. त्याने 61 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. कोहलीने आतापर्यंतच्या खेळीत दोन चौकार आणि एक षटकार मारला आहे. तो मोठ्या संपर्कात दिसत असून भारतीय संघाला लक्ष्याच्या जवळ घेऊन जात आहे. आता भारताला विजयाकडे नेण्याची जबाबदारी कोहलीच्या खांद्यावर आहे.
भारताची चौथी विकेट पडली
भारताची चौथी विकेट 151 धावांवर पडली. अक्षर पटेल चार चेंडूत दोन धावा करून धावबाद झाला. स्टीव्ह स्मिथच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे ऑस्ट्रेलियाला महत्त्वाची विकेट मिळाली आणि कांगारू संघ सामन्यात परतला आहे. विराट कोहली आणि हार्दिक पांड्या क्रीजवर आहेत.
भारताची धावसंख्या दीडशेच्या पुढे गेली
भारताच्या धावसंख्येने तीन विकेट गमावून 150 धावा केल्या आहेत. विराट कोहली आणि अक्षर पटेल क्रीजवर आहेत. हे दोघेही चांगली भागीदारी करून टीम इंडियाला लक्ष्याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करतील.
146 धावांवर भारताला तिसरा धक्का
146 धावांवर भारताची तिसरी विकेट पडली. लोकेश राहुल 50 चेंडूत 32 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार आणि एक षटकार मारला. अॅडम झाम्पाने त्याला शॉन बाद केले. राहुल आणि कोहली यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली.
विराट आणि राहुलमध्ये अर्धशतकी भागीदारी
विराट कोहली आणि लोकेश राहुल यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली आहे. दोन्ही फलंदाज सावधपणे खेळत आहेत आणि मोठी भागीदारी रचत आहे. भारताची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 130 धावांच्या पुढे गेली आहे.
टीम इंडियाला दुसरा धक्का! कर्णधार रोहितनंतर गिलही आऊट
77 धावांवर भारताची दुसरी विकेट पडली आहे. शुभमन गिल 49 चेंडूत 37 धावा करून बाद झाला. अॅडम झाम्पाने त्याला विकेट्ससमोर पायचीत केले आणि एलबीडब्ल्यू आऊट झाला. गिलने आपल्या खेळीत चार चौकार आणि एक षटकार मारला. 13 षटकांनंतर भारताची धावसंख्या दोन बाद 80 आहे.
टीम इंडियाला मोठा धक्का! कर्णधार रोहित तंबुत
भारताची पहिली विकेट 65 धावांवर पडली आहे, कर्णधार रोहित शर्मा 30 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
टीम इंडियाची दमदार सुरुवात! कांगारूने दिलं 270 रन्सचं टार्गेट
270 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आहे. शुबमन गिल आणि कर्णधार रोहित शर्मा ही जोडी क्रीझवर आहे. दोघेही ते सुरक्षितपणे खेळत आहेत. 5 षटकांनंतर भारताची धावसंख्या बिनबाद 30 अशी आहे.
ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलं 270 धावांचं लक्ष्य!
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 270 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. मोहम्मद सिराजने स्टार्कला बाद करून ऑस्ट्रेलियाचा डाव संपवला. स्टार्कने 10 धावा केल्या.
IND vs AUS 3rd ODI Live: भारतीय गोलंदाजांची कमाल! ऑस्ट्रेलियाला नववा धक्का
ऑस्ट्रेलियन संघाच्या नऊ विकेट पडल्या आहेत. प्रथम अक्षर पटेलने शॉन अॅबॉटला बोल्ड केले. त्यानंतर सिराजने अॅश्टन आगरला बाहेरचा रास्ता दाखवला. अॅबॉटने 26 आणि अॅश्टन अगरने 17 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 46 षटकांनंतर 9 गडी बाद 249 अशी आहे.
ऑस्ट्रेलियन संघाच्या नऊ विकेट पडल्या आहेत. प्रथम अक्षर पटेलने शॉन अॅबॉटला बोल्ड केले. त्यानंतर सिराजने अॅश्टन आगरला बाहेरचा रास्ता दाखवला. अॅबॉटने 26 आणि अॅश्टन अगरने 17 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 46 षटकांनंतर 9 गडी बाद 249 अशी आहे.
चेन्नईत कुलदीप यादवची कमाल! ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का
कुलदीप यादवने ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का दिला आहे. त्याने 39व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अॅलेक्स कॅरीला क्लीन बोल्ड केले. कॅरीने 46 चेंडूत 38 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने 39 षटकात 7 विकेट गमावत 203 धावा केल्या आहेत.
मार्कस स्टॉइनिसही आउट
मार्कस स्टॉइनिसला अक्षर पटेलने बाद केले. 26 चेंडूत 25 धावा करून तो बाद झाला. स्टॉइनिसने अॅलेक्स कॅरीसोबत सहाव्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाच्या सहा विकेट्सवर 196धावा आहेत.
हार्दिकनंतर कुलदीपने घातला धुमाकूळ! कांगारूचा निम्मा संघ तंबुत
हार्दिकनंतर कुलदीपने धुमाकूळ घातला आणि ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ 138 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. कुलदीप यादवने आधी डेव्हिड वॉर्नरला झेलबाद केले. वॉर्नरने 31 चेंडूत 23 धावा केल्या त्यानंतर मार्नस लबुशेनला बाद करून कुलदीप यादवने ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का दिला. लबुशेनने 45 चेंडूत 28 धावा केल्या. शुभमन गिलने त्याचा झेल टिपला.
हार्दिक आणि कुलदीप यांनी आतापर्यंत भारतासाठी शानदार गोलंदाजी केली आहे. हार्दिक पांड्याने तीन तर कुलदीपने दोन विकेट्स घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 29 षटकांत 5 बाद 145 अशी आहे.
हार्दिक पांड्याने कांगारूला दिले धक्क्यावर धक्के
हार्दिक पांड्यानेही ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला. 15व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने मिचेल मार्शला क्लीन बोल्ड केले. मार्शने 47 चेंडूत 47 धावा केल्या. त्याने आठ चौकार आणि एक षटकार मारला.
IND vs AUS 3rd ODI Live: हार्दिक पांड्याने कांगारूला दोन षटकात दिले दोन धक्के
पांड्याने दिला पहिला धक्का
हार्दिक पांड्याने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्याने 11व्या षटकातील पाचव्या चेंडूवर ट्रॅव्हिस हेडला बाद केले. 31 चेंडूत 33 धावा करून कुलदीप यादवला हेडने झेलबाद केले.
त्याने मिचेल मार्शसोबत पहिल्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाने 12 षटकात एका विकेटवर 74 धावा केल्या आहेत.
IND vs AUS 3rd ODI Live: ऑस्ट्रेलियाची तूफानी सुरुवात! भारतीय गोलंदाज विकेटच्या शोधात
ऑस्ट्रेलियाच्या डावाचा पॉवरप्ले संपला आहे. त्याने 10 षटकात बिनबाद 61 धावा केल्या आहेत. मिचेल मार्श 33 चेंडूत नाबाद 33 आणि ट्रॅव्हिस हेड 27 चेंडूत नाबाद 27 धावांवर खेळत आहेत. भारतीय संघ पहिल्या यशाची वाट पाहत आहे.
ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरुवात
तिसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरुवात झाली आहे. मिचेल मार्श ट्रॅव्हिस हेडसह क्रीजवर आले आहेत. डेव्हिड वॉर्नरला सलामीला आला नाही. मोहम्मद शमीने भारताकडून गोलंदाजीची सुरुवात केली आहे.
भारतीय संघाची प्लेइंग-11
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने जिंकले नाणेफेक!
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईच्या नव्या खेळपट्टीवर टीम इंडिया प्रथम गोलंदाजी करेल. भारतीय कर्णधार रोहित शर्माने संघात एकही बदल केला नाही. डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियन संघात परतला आहे. तो अनफिट कॅमेरून ग्रीनच्या जागी खेळेल.