IND vs AUS ODI Updates: एकदिवसीय सामना होणार का रद्द? सामन्याच्या एक तास आधी चेन्नईतून आली मोठी अपडेट | Latest Sport News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs AUS ODI

IND vs AUS ODI: एकदिवसीय सामना होणार का रद्द? सामन्याच्या एक तास आधी चेन्नईतून आली मोठी अपडेट

India vs Australia 3rd ODI भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि निर्णायक वनडे काही तासांनंतर चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या जाणार आहे. तीन सामन्यांची वनडे मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे.

भारतासाठी हा सामना 'करा किंवा मरो'चा असणार आहे. मालिका जिंकण्यासाठी भारतासाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. (Latest Sport News)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या आणि निर्णायक वनडेमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळू शकतो. चेन्नईमध्ये दुपारी 1:30 वाजता सुरू होणार आहे, परंतु येथे 12 वाजण्याच्या सुमारास आणि पुन्हा 3 वाजण्याच्या सुमारास पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे.

पावसामुळे वेळ वाया जाण्याची शक्यता असून, त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना निराशेचा सामना करावा लागू शकतो.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 12 वाजेपर्यंत पावसाची शक्यता 16 टक्के आहे. या दरम्यान ताशी 13 किमी वेगाने वारे वाहतील. जसजसा दिवस पुढे सरकतो तसतसा पावसाची शक्यता कमी असते, पण मध्यभागी पडणारा पाऊस हा सामना नक्कीच थांबवू शकतो.

चेन्नईमध्ये 12 वाजण्याच्या सुमारास पाऊस पडला तर टॉसला उशीर होऊ शकतो. 3 वाजेच्या सुमारास आकाश 70 टक्के ढगाळ असेल, परंतु याशिवाय बहुतांश सामन्यांदरम्यान केवळ 30 टक्के ढगच दिसतील. नाणेफेकीच्या वेळी तापमान 32 अंश सेल्सिअस आणि रात्री 9 वाजता सुमारे 29 अंश सेल्सिअस असणार आहे

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द झाल्यास तीन सामन्यांची वनडे मालिका 1-1 अशी बरोबरीत राहील. यासह ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका जिंकण्याची भारताची संधी संपुष्टात येईल.

मुंबईतील पहिली वनडे भारताने 5 विकेट्सने जिंकली, पण विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने भारतावर 10 गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.