IND vs AUS: चेन्नईत कुलदीप-हार्दिकचा कहर! वादळी सुरुवातीनंतर कांगारूला 269 धावांवर लोळवलं

IND vs AUS 3rd ODI Score Hardik Pandya Kuldeep Yadav scalp three wickets
IND vs AUS 3rd ODI Score Hardik Pandya Kuldeep Yadav scalp three wickets

IND vs AUS 3rd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन वनडे मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. या रोमांचक सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने 269 धावा केल्या आहेत.

गेल्या सामन्यात मिचेल मार्श कांगारू संघासाठी सर्वात यशस्वी फलंदाज ठरला होता. डावाची सुरुवात करताना त्याने 47 चेंडूत 47 धावांची खेळी केली. दरम्यान त्याच्या बॅटमधून आठ चौकार आणि एक षटकार आला.

IND vs AUS 3rd ODI Score Hardik Pandya Kuldeep Yadav scalp three wickets
Team India News: टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू IPL अन् WTC फायनलमधून बाहेर

शेवटच्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचे जवळपास सर्वच फलंदाज चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करण्यात अपयशी ठरले. स्टीव्ह स्मिथ वगळता प्रत्येक ऑस्ट्रेलियन फलंदाजाने दुहेरी आकडा गाठला, पण अर्धशतकही झळकावता आले नाही. दोन फलंदाजांनी 30 पेक्षा जास्त धावा केल्या, तर चार फलंदाजांनी 20-30 च्या दरम्यान धावा केल्या. यापैकी कोणत्याही फलंदाजाने मोठी खेळी केली असती तर कांगारू संघाला 300 च्या जवळपास धावा करता आल्या असत्या.

अॅलेक्स कॅरीने 46 चेंडूत 38 धावांचे योगदान दिले. त्याचवेळी ट्रॅव्हिस हेडने 31 चेंडूत 33, मार्नस लबुशेनने 45 चेंडूत 28, मार्कस स्टॉइनिसने 26 चेंडूत 25 आणि डेव्हिड वॉर्नरने 31 चेंडूत 23 धावा केल्या.

IND vs AUS 3rd ODI Score Hardik Pandya Kuldeep Yadav scalp three wickets
Team India WC23 : कोच राहुल द्रविडचा मोठा खुलासा! वर्ल्ड कप साठी भारतीय संघ निश्चित; सूर्या...

शेवटच्या वनडेतही ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथची बॅट शांत राहिली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने एकूण तीन चेंडूंचा सामना केला. दरम्यान तो खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. अष्टपैलू हार्दिक पांड्याने त्याला वनडेत पाचव्यांदा आपला बळी बनवले आहे.

टीम इंडियासाठी शेवटच्या एकदिवसीय सामन्यात हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांनी तीन विकेट घेतल्या. या दोन गोलंदाजांव्यतिरिक्त अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज यांनी अनुक्रमे दोन यश मिळवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com