IND vs AUS : तिसऱ्या सामन्यात होणार पंतची हकालपट्टी, हे आहे प्रमुख कारण

रोहित शर्मा या सामन्यात पुन्हा एकदा प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करणार?
ind vs aus 3rd t20i probable playing 11 rishabh pant dropped
ind vs aus 3rd t20i probable playing 11 rishabh pant droppedsakal

India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात पुन्हा एकदा प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतो. मालिकेतील दुसरा सामना नागपुरात झाला होता. पावसाने व्यत्यय आणलेला हा सामना केवळ 8-8 षटकांचा झाला. ज्यात टीम इंडियाने 6 विकेट्सने विजय मिळवला. रोहित शर्माने या मॅचमध्ये कमी ओव्हर्समुळे एक बॉलर कमी खेळवून ऋषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिलं होतं. हैदराबादमध्ये रोहित पुन्हा एकदा 5 गोलंदाजांसह मैदानात उतरेल.

ind vs aus 3rd t20i probable playing 11 rishabh pant dropped
INDvsENG 'आम्ही चुकीचं केलं...'; 'त्या' विकेटच्या वादावर कॅप्टन कौरने सोडले मौन

नागपूर टी-20 मध्ये भारताने जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, अक्षर पटेल आणि युजवेंद्र चहल या चार गोलंदाजांसह मैदानात उतरले होती. त्याचवेळी हार्दिक पांड्या संघात अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावत आहे. निर्णायक सामन्यात रोहित शर्माला धोका पत्करायचा नाही. हार्दिक पांड्यासह एकूण 6 गोलंदाजांसह मैदानात उतरण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे. जर तो अतिरिक्त गोलंदाज खेळला तर ऋषभ पंत संघाबाहेर जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा कोणाला संधी देणार ?

ind vs aus 3rd t20i probable playing 11 rishabh pant dropped
What Is Mankading : 'मंकडिंग' म्हणजे काय माहितीये? जाणून घ्या सुरुवात कशी झाली

भारतासमोर तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून भुवनेश्वर कुमार आणि दीपक चहरच्या रूपात दोन पर्याय आहेत. उमेश यादव देखील भारतीय संघाचा एक भाग असला तरी तो टी-20 विश्वचषक संघात नाही. त्यामुळे रोहित भुवी किंवा चहरला संधी देण्याचा विचार करेल. दीपक चहर राखीव खेळाडू म्हणून टी-20 विश्वचषक खेळणार आहे. भुवनेश्वर कुमारला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात संधी देण्यात आली होती. अशा परिस्थितीत दीपक चहरला विश्वचषकापूर्वी सरावाची संधी मिळावी, अशी रोहितची इच्छा आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार/दीपक चहर, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com