
IND vs AUS: लाजिरणाव्या पराभवानंतर भारताची WTCच्या पॉइंट टेबलमध्ये काय आहे स्थिती
Ind vs Aus Test WTC Final qualification Scenario : ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या कसोटीत अडीच दिवसात भारताला पराभवाची धूळ चारली. पहिल्या दोन कसोटींत हार पत्करलेला ऑस्ट्रेलियाने जबरदस्त कमबॅक केले. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा नऊ गडी राखून पराभव केला.
इंदूर कसोटीतील विजयानंतर आता कांगारू संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. जेतेपदाच्या लढतीत पोहोचणारा हा पहिला संघ ठरला आहे.
भारतीय संघाने हा सामना जिंकला असता तर अंतिम फेरी गाठली असती, मात्र आता प्रतीक्षा करावी लागणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडमधील ओव्हल येथे 7 ते 11 जून दरम्यान खेळल्या जाणार आहे.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (2022-2023) या कालावधीत ऑस्ट्रेलिया एक मजबूत संघ म्हणून वर आला आहे. पॅट कमिन्सच्या संघाने 18 पैकी 11 कसोटी जिंकल्या आहेत. दुसरीकडे भारतीय संघ 18 कसोटी सामने खेळला आहे. ज्यात 10 जिंकले आहेत. पाच सामन्यांत पराभव तर दोन सामने अनिर्णित राहिले आहेत.
इंदूर कसोटीनंतर गुणतालिकेची स्थिती काय आहे?
इंदूरमधील विजयानंतर ऑस्ट्रेलियाचे गुणतालिकेत 68.52 टक्क्यांवर पोहोचले आहे. आता भारताविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत तो हरला तरी त्याला काही फरक पडणार नाही.
दुसरीकडे पराभवानंतर टीम इंडियाचे 60.29 टक्के गुण आहेत. तो अजूनही दुसऱ्या स्थानावर कायम आहे.
भारतासाठी काय आहे समीकरण
अहमदाबाद येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत विजय मिळवल्यास भारताचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल.
अहमदाबाद कसोटीत टीम इंडिया हरली किंवा तो सामना अनिर्णित राहिला, तर अडचणींचा सामना करावा लागेल.
पराभव झाल्यास त्याला श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.
अशा स्थितीत न्यूझीलंडने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत किमान एका सामन्यात श्रीलंकेचा पराभव करावा अशी भारताची इच्छा राहिल.