
IND vs AUS 3rd Test: ऑस्ट्रेलियाचे जोरदार पुनरागमन! भारताचे दात घातले घशात
India vs Australia 3rd Test Day 3 Live Cricket Score : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना इंदूरमध्ये खेळल्या गेला. तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा नऊ गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह त्याने मालिकेत पुनरागमन केले आहे.
पहिले दोन कसोटी सामने जिंकूनही भारत 2-1 ने आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात विजयासाठी 76 धावांचे लक्ष्य मिळाले होते. इंदूरमध्ये टीम इंडियाचा नऊ विकेटने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने सहा वर्षांनंतर भारतात कसोटी जिंकली.
आता चौथा कसोटी सामना 9 मार्चपासून अहमदाबाद येथे खेळल्या जाणार आहे.
IND vs AUS : पराभवाची टांगती तलवार! आता चमत्कारावरच टीम इंडियाचा भरवसा
क्रिकेटध्ये काहीही अशक्य नाही, केवळ भरवसा हवा असे म्हटले जाते... भारतीय क्रिकेट संघ आता भरवसा आणि चमत्कारावरच अवलंबून आहे. तिसरा कसोटी सामना हातातून जवळपास गेलाच आहे. केवळ दुसऱ्या दिवशी सकाळी जे घडले तेच आज सकाळी घडते का, यावर भारतीयांच्या सर्व आशा अवलंबून आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ऑस्ट्रेलियाच्या डावाला काही वेळात सुरूवात
76 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्रेलिया थोड्याच वेळात मैदानात उतरेल. त्यांचे सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि ट्रॅव्हिस हेड डावाची सुरुवात करू शकतात. कांगारू संघाची नजर मालिकेतील पहिल्या विजयावर आहे. रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल या फिरकी त्रिकुटाचा सामना करावा लागणार आहे.
पहिल्याच षटकात अश्विनने दिला कांगारूंला धक्का! होणार का चमत्कार ?
रविचंद्रन अश्विनने पहिल्याच षटकात भारतीय संघाला यश मिळवून दिले. त्याने दुसऱ्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाला बाद केले. अश्विनचा चेंडू ख्वाजाच्या बॅटला लागला आणि केएस भरतच्या हातात गेला. ख्वाजा खाते उघडू शकला नाही.
6 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची काय आहे परिस्थिती?
6 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाने 1 गडी गमावून 10 धावा केल्या आहेत. अश्विन आणि जडेजाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. उस्मान ख्वाजा बाद झाल्यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन सावधपणे फलंदाजी करत आहेत.
ऑस्ट्रेलियाने विजयाकडे वाटचाल
ख्वाजाची विकेट पडल्यानंतर मार्नस लॅबुशेन आणि ट्रॅव्हिस हेडने डावाची धुरा सांभाळली आहे. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 35 धावांची भागीदारी केली. हेड 23 आणि लबुशेन 11 धावांवर नाबाद आहेत. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी आणखी 41 धावांची गरज आहे.
भारताच्या सर्व आशा संपल्या! ऑस्ट्रेलिया विजयाच्या जवळ
तिसऱ्या दिवशी पहिल्या तासाचे खेळ पूर्ण झाला आहे. या एका तासात ऑस्ट्रेलियाने 1 विकेट गमावून 56 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाला आता विजयासाठी आणखी 20 धावा करायच्या आहेत. दोन सामने गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन केले आहे.
ऑस्ट्रेलियाने सहा वर्षांनंतर भारतात जिंकली कसोटी!
ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी उपाहारापूर्वी सामना संपवला. त्याने 18.1 षटकांत 76 धावांचे लक्ष्य गाठले. कांगारू संघाने एका विकेटवर 78 धावा केल्या. ट्रॅव्हिस हेड 53 चेंडूत 49 धावा करून नाबाद राहिला. त्याचवेळी मारांश लबुशेनने नाबाद 28 धावा केल्या. उस्मान ख्वाजा खाते उघडू शकला नाही. या विजयासह त्याने मालिकेत पुनरागमन केले आहे. पहिले दोन कसोटी सामने जिंकूनही भारत 2-1 ने आघाडीवर आहे. आता उभय देशांमधील चौथा कसोटी सामना 9 मार्चपासून अहमदाबाद येथे खेळल्या जाणार आहे.
भारताने पहिल्या डावात 109 धावा केल्या होत्या. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने 197 धावा केल्या होत्या. त्याला 88 धावांची आघाडी मिळाली. यानंतर भारतीय संघ दुसऱ्या डावात 163 धावांत सर्वबाद झाला. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाला 76 धावांचे लक्ष्य मिळाले. प्रत्युत्तरात कांगारू संघाने 18.5 षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात 78 धावा करत सामना जिंकला.