IND vs AUS: लाल अन् काळी माती काय गौडबंगाल आहे; इंदूरच्या खेळपट्टीची एवढी का होतेय चर्चा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ind vs aus 3rd test indore test match-red-soil-pitch-report india-vs-australia cricket news kgm00

IND vs AUS: लाल अन् काळी माती काय गौडबंगाल आहे; इंदूरच्या खेळपट्टीची एवढी का होतेय चर्चा?

India vs Australia 3rd Test Indore Pitch Report : दुसरा कसोटी सामना तीन दिवसांत संपल्यामुळे दोन दिवसांची अतिरिक्त सुट्टी मिळाल्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंनी आता तिसऱ्या कसोटीसाठी सराव करत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना १ मार्चपासून सुरू होत आहे. या मालिकेच्या सुरुवातीपासूनच खेळपट्टीबाबत आधी नागपुरात आणि नंतर दिल्ली कसोटीत बराच गदारोळ झाला होता. पण आता इंदूरच्या खेळपट्टीबाबतही गदारोळ सुरू आहे.

तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी खेळपट्टीचे काही फोटो समोर आले आहेत. यासोबतच काही बातम्याही आल्या, ज्यात इंदूरची खेळपट्टी लाल मातीपासून तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र फोटो समोर आल्यानंतर खेळपट्टीचा काही भाग काळ्या मातीचाही असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

लाल मातीपासून खेळपट्टी तयार केली असेल तर त्यावर हलके गवत देखील सोडले जाते. अशा परिस्थितीत या खेळपट्टीवर बाऊन्स आणि वेग दिसून येतो, याचा अर्थ या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. दुसरीकडे काळ्या मातीच्या खेळपट्टीवर चेंडू थांबतो, अशा स्थितीत फिरकीपटूंना फायदा होतो. या स्थितीत इंदूर कसोटी सामन्याची प्रतीक्षा आहे, जिथे खेळपट्टीबाबत गदारोळ सुरू आहे.

लाल मातीची खेळपट्टी असेल तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होऊ शकतो कारण ताज्या खेळपट्टीत बाऊन्स असेल तर फलंदाजी करणे काहीसे सोपे होईल. अशा परिस्थितीत नाणेफेकही येथे खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

इंदूरमध्ये सामना सुरू होण्याच्या दोन दिवस आधी खेळपट्टीवर रोलर चालवून पाणी सोडण्यात आले आहे. हे अनेकदा कसोटी सामन्यापूर्वी केले जाते, येथे घरच्या संघाला किती पाणी आणि रोलर वापरायचे आहे याचा काही फायदा होतो. आता हे पाहावे लागेल की 1 मार्चला इंदूरमध्ये दोन्ही संघ आमनेसामने असतील.