
IND vs AUS: कर्णधार रोहित 'या' दिग्गज खेळाडूंचा पुन्हा प्लेइंग-11 मधून करणार पत्ता कट!
India vs Australia 3rd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्यापासून इंदूरच्या होळकर मैदानावर चार सामन्यांच्या बॉर्डर गावसकर मालिकेतील तिसरा कसोटी सामना खेळल्या जाणार आहे. इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियाच्या या खेळाडूंचा प्लेइंग-11 मधून पुन्हा पत्ता कट करणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूर आणि दिल्ली येथे झालेल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कर्णधार रोहित शर्माने चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला संधी दिली नाही. कुलदीप यादवकडे दुर्लक्ष करून कर्णधार रोहित शर्मा आणि भारतीय संघ व्यवस्थापनाने डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलला संधी दिली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये रोहित शर्माने कुलदीप यादवला भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले. टीम इंडियाचा 'चायनामन' फिरकीपटू कुलदीप यादव टीम इंडियातील राजकारणाचा बळी ठरला आहे. बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात कुलदीप यादवला 'मॅन ऑफ द मॅच'चा पुरस्कार देण्यात आला.
कुलदीप यादवने या सामन्यात एकूण 8 विकेट घेतल्या आणि पहिल्या डावात उपयुक्त 40 धावा केल्या, ज्यामुळे भारताने बांगलादेशविरुद्धची पहिली कसोटी 188 धावांनी जिंकली. यानंतर पुढच्याच सामन्यात कुलदीप यादवला वगळण्यात आले.
कुलदीप यादवने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील बहुतांश वेळ बेंचवर बसून पाणी पिण्यात घालवला आहे. उत्कृष्ट रेकॉर्ड असूनही कुलदीप यादवला ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन, अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले.
कुलदीप यादवने आतापर्यंत भारतासाठी 8 कसोटी सामन्यांमध्ये 34 विकेट घेतल्या आहेत, ज्यामध्ये त्याने 3 वेळा एका डावात 5 विकेट घेण्याचा पराक्रम केला. एवढा चांगला रेकॉर्ड असतानाही कुलदीप यादवला ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांच्यामुळे कसोटी संघाबाहेर राहावे लागले.