IND vs AUS 4th Test Pitch : ही का ती... जीसीए क्युरेटर्सच्या रणनितीने कांगारू गोंधळले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs AUS 4th Test Ahmedabad Pitch

IND vs AUS 4th Test Pitch : ही का ती... जीसीए क्युरेटर्सच्या रणनितीने कांगारू गोंधळले

IND vs AUS 4th Test Ahmedabad Pitch : भारत आणि ऑस्ट्रेलिया याच्यात सुरू असलेल्या बॉर्डर - गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील खेळपट्ट्यांबाबत खूप चर्चा होत आहे. आयसीसीने दिल्ली कसोटीतील खेळपट्टीला सर्वसाधारण रेटिंग दिले. त्यानंतर इंदूर कसोटीतील खेळपट्टीला वाईट असे रेटिंग दिले. या मालिकेतील तीनही कसोटीत सामने हे अडीत दिवसात संपले. या खेळपट्टीवर फिरकीपटूंचा बोलबाला राहिला आहे.

पहिल्या तीन कसोटीत फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्ट्या असल्याने आणि त्यांना आयसीसीचे वाईट रेटिगं मिळाल्यामुळे अहमदाबादमधील खेळपट्टी कशी असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र गुजरात क्रिकेट असोसिएशनने एक मोठी रणनिती आखत शेवटपर्यंत सामन्यात कोणती खेळपट्टी खेळवण्यात येईल याचा उलगडा केलेला नाही. यामुळे कांगारूंनी सामना कोणत्या खेळपट्टीवर होणार याची कल्पनाच नाही. याचा परिणाम त्यांच्या प्लॅनिंगवर होत आहे.

विशेष म्हणजे भारतीय संघ देखील खेळपट्टीबाबत गोंधळलेला दिसत आहे. याबाबत गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या सूत्राने पीटीआयशी बोलताना माहिती दिली की, 'भारतीय संघाकडून आम्हाला खेळपट्टीबद्दल अजून कोणतीही सुचना मिळालेली नाही. आमचे स्थानिक क्युरेटर हे आम्ही या हंगामात जशी खेळपट्टी बनवतो तशीच सर्वसाधारण खेळपट्टी तयार करत आहेत.'

तो पुढे म्हणाला की, 'गेल्या काही दिवसांपासून बीसीसीआयची ग्राऊंड आणि खेळपट्टी समिती स्थानिक क्युरेटर्सना सल्ला देत आहेत. मात्र आमच्याकडून कसोटी सामन्यासाठी चांगली खेळपट्टी तयार करण्याचाच प्रयत्न सुरू आहे.'

ऑस्ट्रेलियाने पहिल्या दोन कसोटी गमावल्यानंतर तिसऱ्या कसोटीत कांगारूंनी दमदार पुनरागमन केले. त्यामुळे मालिका आता 2 - 1 अशी आली आहे. चौथ्या कसोटीत भारताने विजय मिळावला किंवा सामना ड्रॉ झाला तर ते मालिका खिशात घालतील. जर कांगारू जिंकले तर मालिका 2 - 2 अशी बरोबरीत सुटेल.

(Sports Latest News)

हेही वाचा : परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर