
IND vs AUS : दिग्गज खेळाडूचा मोठा दावा! पराभवानंतरही टीम इंडिया WTC फायनलमध्ये...
India vs Australia 4th Test : बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. तिसरी कसोटी जिंकून डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचणारा ऑस्ट्रेलियन संघ पहिला संघ ठरला आहे. त्याचवेळी टीम इंडियाला चौथ्या कसोटीत विजय आवश्यक आहे तरच आपले स्थान निश्चित करता येईल. याशिवाय श्रीलंकेचा संघही या शर्यतीत आहे. त्याचवेळी माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी याबाबत मोठा दावा केला आहे.
माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर म्हणाले की, भारत चौथ्या कसोटीत पराभूत झाला तरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचेल. श्रीलंकेचा संघ न्यूझीलंडविरुद्धचे दोन कसोटी सामने 2-0 ने जिंकू शकत नाही, असेही त्याचे मत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या पहिल्याच दिवशी श्रीलंकेने 300 चा आकडाही पार केला आहे.
संजय मांजरेकर यांनी स्टार स्पोर्ट्सवर बोलताणा सांगितले की, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारत अंतिम फेरीत पोहोचण्याच्या मार्गावर आहे. मला वाटत नाही की श्रीलंका कसोटी मालिकेत न्यूझीलंडला हरवू शकेल. त्यामुळे टीम इंडिया चौथ्या कसोटीत हरली तरी अंतिम फेरीत प्रवेश करू शकतो.
पुढे बोलताणा ते म्हणाले की “म्हणून मला विश्वास आहे की भारत फायनलमध्ये जाईल, पण तरीही तुम्हाला अधिकृतपणे तिथे पोहोचायचे आहे. त्यामुळे संघ तणावात होता. ऑस्ट्रेलिया इंदूरमध्ये शानदार पुनरागमन केले आहे.