IND vs AUS Day-2 : अश्विनचा षटकार! कांगारूंचा पहिला डाव 480 धावांवर आटोपला, भारताचीही चांगली सुरूवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs AUS Day-2 Live :

दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीन क्रीजवर आहेत. दिवसाच्या पहिल्याच षटकात एकेरी घेत ग्रीनने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे सातवे अर्धशतक होते. त्याचवेळी आशियाई खेळपट्ट्यांवर त्याचे हे तिसरे अर्धशतक ठरले.

IND vs AUS Day-2 : अश्विनचा षटकार! कांगारूंचा पहिला डाव 480 धावांवर आटोपला, भारताचीही चांगली सुरूवात

India vs Australia 4th Test Day 2 Live Cricket Score : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जात आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातून भारताला हा सामना जिंकणे आवश्यक आहे. दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्राअखेर ऑस्ट्रेलियाचा संघ गडगडला. आर अश्विनने डावात 6 बळी घेतले आणि ऑस्ट्रेलियाला 480 धावांवर ऑल आऊट केले. उस्मान ख्वाजाने 180 तर कॅमेरून ग्रीनने 114 धावा केल्या.

यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने आपल्या पहिल्या डावात 10 षटकात बिनबाद 36 धावा केल्या. सलामीवीर शुभमन गिल 18 तर रोहित शर्मा 17 धावांवर नाबाद राहिले.

भारताच्या दुसऱ्या दिवशी बिनबाद 36 धावा

भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी बिनबाद 36 धावा केल्या. सलामीवीर शुभमन गिलने 18 तर रोहित शर्माने 17 धावा केल्या. उद्या भारत 36 धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात करेल.

अश्विनचा विकेटचा षटकार! कांगारूंचा पहिला डाव 480 धावांवर आटोपला

नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला डाव 480 धावांवर संपला.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा - IND vs AUS: ख्वाजा भाऊने रोहित सेनेला दिवसभर रडवलं! शेवटी शेपूटही वळवळलं

ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! ख्वाजा भाऊचे द्विशतक हुकले

ऑस्ट्रेलियाला 409 धावांवर आठवा धक्का बसला आहे. ख्वाजाचे द्विशतक हुकले त्याला अक्षर पटेल एलबीडब्ल्यू बाद केले. 422 चेंडूत 180 धावा करून बाद झाला. मैदानावरील पंच नितीन मेनन यांनी यापूर्वी ख्वाजाला नाबाद दिले होते.

चहापर्यंत ऑस्ट्रेलिया 409/7

चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाने सात गडी गमावून 409धावा केल्या आहेत. सध्या उस्मान ख्वाजा 180 धावा करून क्रीजवर असून नॅथन लियॉन सहा धावांवर खेळत आहे. आतापर्यंत दोघांमध्ये आठव्या विकेटसाठी 22 धावांची भागीदारी झाली आहे.

आज 30 पेक्षा जास्त षटके खेळायला बाकी आहेत. आज भारताकडून रविचंद्रन अश्विन हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने आज तीन विकेट घेतल्या. त्याने कॅमेरून ग्रीन (114), अॅलेक्स कॅरी (0) आणि मिचेल स्टार्क (6) यांना बाद केले आहे. तत्पूर्वी काल त्याने ट्रॅव्हिस हेडलाही बाद केले.

अश्विनने कांगारूंला दिला सातवा धक्का

ऑस्ट्रेलियाला 387 धावांवर सातवा धक्का बसला. रविचंद्रन अश्विनने मिचेल स्टार्कला झेलबाद केले. स्टार्कला सहा धावा करता आल्या. आज ऑस्ट्रेलियन संघाला तीन धक्के बसले असून अश्विनने तिन्ही विकेट घेतल्या आहेत. अश्विनने आधी कॅमेरून ग्रीन (114) आणि अॅलेक्स कॅरी (0) यांना बाद केले. या सामन्यात त्याने एकूण चार विकेट घेतल्या आहेत. अश्विनने ट्रॅव्हिस हेडला आज तीन विकेट्सपूर्वी बाद केले.

अश्विन ठरला तारणहार! एकाच षटकात कांगारूंना दोन धक्के

ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या दिवशी कॅमेरून ग्रीनच्या रूपाने पहिला धक्का बसला. त्याला रविचंद्रन अश्विनने बाद केले. ग्रीन 170 चेंडूत 114 धावा करून बाद झाला. बाद होण्यापूर्वी ग्रीनने उस्मान ख्वाजासोबत पाचव्या विकेटसाठी 208 धावांची भागीदारी केली.

तो बाद झाल्यानंतर अॅलेक्स कॅरी मैदानात आला, पण अश्विन त्याच षटकात त्याला झेलबाद केले. कॅरी या मालिकेत पाचव्यांदा अश्विनचा बळी ठरला. सध्या उस्मान ख्वाजा 162 धावांवर नाबाद आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत सहा गडी गमावून 378 धावा केल्या आहेत.

ख्वाजा भाऊने ठोकल्या शानदार दीडशे! लंचपर्यंत भारतीय गोलंदाज विकेटलेस

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत पहिल्या डावात चार गडी गमावून 347 धावा केल्या. भारतीय गोलंदाज दुसऱ्या दिवशी विकेटलेस दिसले. दुस-या दिवशी आतापर्यंत 29 षटके टाकली आहेत, मात्र भारतीय संघाला आज एकही विकेट मिळाली नाही. सध्या उस्मान ख्वाजा 354 चेंडूत 150 धावा आणि कॅमेरून ग्रीन 135 चेंडूत 95 धावा करत क्रीजवर आहे. ग्रीनने पाच धावा केल्‍यावरच कसोटीमध्‍ये पहिले शतक झळकावले होते. या दोघांमध्ये आतापर्यंत पाचव्या विकेटसाठी 290 चेंडूत 177 धावांची भागीदारी झाली आहे.

ख्वाजा भाऊने ठोकल्या शानदार दीडशे! 

ऑस्ट्रेलियाने चार गडी गमावून 337 धावा केल्या आहेत. उस्मान ख्वाजाने चार चौकारांसह 150 धावा केल्या. ख्वाजा तब्बल आठ तास फलंदाजी करत आहे. तो काल दिवसभर खेळला. आजही तो फलंदाजी करत आहे. त्याचबरोबर कॅमेरून ग्रीनही शतकाच्या जवळ आहे. त्याने 85 धावा केल्या आहेत. दुसऱ्या दिवशीही भारतीय गोलंदाजांना विकेट्सची आस लागली आहे.

1 तास झाला तरी....; कांगारूंनी भारतीय गोलंदाजांना आणलं रडकुंडीला!

दुसऱ्या दिवशी जवळपास एक तास उलटून गेला आहे आणि भारतीय संघ आज विकेट्ससाठी तरसत आहे. आज 17 षटकांत भारतीय संघाला एकही विकेट घेता आलेला नाही. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या सध्या चार विकेट्सवर 296 धावा आहे. कॅमेरून ग्रीन 65 आणि उस्मान ख्वाजा 129 धावा करून फलंदाजी करत आहे. आतापर्यंत दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी 126 धावांची भागीदारी झाली आहे.

उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीन यांच्यात शतकी भागीदारी

उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीन यांनी पाचव्या विकेटसाठी 100 हून अधिक धावांची भागीदारी केली आहे. दुसऱ्या दिवशी अर्धा तासाचा खेळ संपला आणि भारतीय गोलंदाज विकेट्ससाठी आसुसले आहेत. ख्वाजा सध्या 114 आणि ग्रीन 59 धावा करून क्रीजवर आहे.

दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु! टीम इंडिया समोर कांगारूं कठीण पेपर

IND vs AUS Day-1 : पहिल्या दिवशी काय झाले?

अहमदाबादच्या सपाट खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. हेड आणि ख्वाजा यांनी पहिल्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. यानंतर हेड 32 तर लबुशेन 3 धावा करून आऊट झाले, पण स्मिथने ख्वाजासोबत मोठी भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला चांगल्या स्थितीत आणले.

स्मिथला अर्धशतक झळकावता आले नाही आणि त्याच्या पाठोपाठ आलेला पीटर हँड्सकॉम्ब ही छोट्या धावसंख्येवर पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, यानंतर ग्रीन आणि ख्वाजा यांनी एकही विकेट पडू दिली नाही. दरम्यान ख्वाजानेही आपले शतक पूर्ण केले. त्याच वेळी ग्रीन अर्धशतकाच्या जवळ आहे. भारताकडून शमीने दोन आणि अश्विन-जडेजाने प्रत्येकी एक विकेट घेतली.