Sarfaraz Khan: सर्फराजला वारंवार का दिला जातोय डच्चु? BCCI निवडकर्त्याचा खळबळजनक खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sarfaraz Khan vs BCCI

Sarfaraz Khan: सर्फराजला वारंवार का दिला जातोय डच्चु? BCCI निवडकर्त्याचा खळबळजनक खुलासा

Sarfaraz Khan vs BCCI : टीम इंडियाने श्रीलंका आणि न्यूझीलंडसारख्या संघांना हरवून नवीन वर्षाची सुरुवात केली आहे. पण भारतीय संघाची खरी परीक्षा ऑस्ट्रेलियाशी कधी होणार आहे. बॉर्डर गावसकर करंडक स्पर्धेला फेब्रुवारीमध्ये सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधी संघाची निवड हा चर्चेचा विषय बनला आहे. बीसीसीआयने दोन कसोटींसाठी संघ जाहीर केला होता. ज्यामध्ये रणजीमध्ये तांडव करणाऱ्या सरफराजचे नाव नव्हते.

बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत सरफराजला संधी मिळणार असल्याची चर्चा होती. पण तो बाजूला झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी संघाच्या घोषणेची सरफराज वाट पाहत होता, पण तिथेही या खेळाडूची निराशा झाली. मात्र या खेळाडूबाबत अनेक दिग्गजांनी बीसीसीआयवर टीकाही केली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सरफराजची सरासरी 80च्या पुढे गेली आहे. त्याने विराट आणि सचिनसारख्या दिग्गजांना मागे सोडले आहे. त्याचवेळी आता चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील समितीचे नवे सदस्य श्रीधरन शरथ यांनी याप्रकरणी मौन सोडले आहे.

स्पोर्ट्स स्टारशी संवाद साधताना श्रीधरन शरथ म्हणाले की, 'तो नक्कीच आमच्या रडारवर आहे. आगामी काळात त्यांना संधी दिली जाणार नाही. संघ निवडताना संयोजन आणि समतोल या गोष्टींचा विचार करावा लागतो.

सरफराजने दिल्लीविरुद्धच्या शेवटच्या रणजी सामन्यात मुंबईसाठी 125 धावा केल्या. हे त्याचे प्रथम श्रेणीतील तेरावे शतक आहे. सरफराजने रणजी ट्रॉफी 2021-22 मध्ये 122.75 च्या सरासरीने 982 धावा केल्या आहेत. त्यानंतर त्याने दोन शतके आणि चार अर्धशतके झळकावली. 2019-20 मध्ये त्याने सहा सामन्यांमध्ये 154.66 च्या सरासरीने 928 धावा केल्या. सर्फराजच्या बॅटमधून दोन शतके आणि तीन अर्धशतके झळकली. चालू मोसमात त्याने 500 हून अधिक धावा केल्या.