IND vs AUS: गुजरातमध्ये मोहम्मद शमीला बघून 'जय श्रीराम'चे नारे! त्यावर त्याने असे काही केले की... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ind vs aus fans-chant-jai-shri-ram-in-front-of-mohammed-shami-during-4th-test-at-ahmedabad-watch-viral-video cricket news in marathi kgm00

IND vs AUS: गुजरातमध्ये मोहम्मद शमीला बघून 'जय श्रीराम'चे नारे! त्यावर त्याने असे काही केले की...

IND vs AUS Mohammed Shami : भारतात क्रिकेट हा केवळ खेळ नसून तो एक धर्म मानल्या जातो. पण दुर्दैवाने अहमदाबादमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम कसोटीदरम्यान चाहत्यांचे लज्जास्पद कृत्य पुन्हा समोर आले.

खरं तर, चौथ्या कसोटीदरम्यान भारतीय खेळाडू जेव्हा डगआऊटजवळ आले तेव्हा एका चाहत्याने 'शमी, जय श्री राम' म्हणायला सुरुवात केली. मोहम्मद शमी एक मुस्लिम क्रिकेटर आहे आणि त्याचे नाव घेऊन अशा घोषणा देण्यात आल्या. मात्र गर्दीच्या ओरडण्याचा शमीवर काहीही परिणाम झाला नाही आणि तो शांत राहिला. आता व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दरम्यान अहमदाबाद कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताचे सलामीवीर शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी दिवसाच्या शेवटच्या 10 षटकात भारतीय धावसंख्या 36 पर्यंत नेली. आॅस्ट्रेलियाकडे 444 धावांची आघाडी आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळपट्टी अजूनही फलंदाजांना अनुकूल असल्याने रोहितने मिशेल स्टार्क आणि नॅथन लियॉनला सहजतेने फटके मारत आहे. तत्पूर्वी, अव्वल भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने कौशल्य आणि नियंत्रणाच्या जादुई प्रदर्शनात सहा विकेट घेत ऑस्ट्रेलियाला 480 धावांत गुंडाळण्यात मोलाचा वाटा उचलला होता.