IND vs AUS: टीम इंडियात खेळण्याची लायकी नाही! KL राहुलवर पाकिस्तानवाले सुद्धा भडकले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 ind vs aus-former-pakistan-captain-rashid-latif-said-kl-rahul

IND vs AUS: टीम इंडियात खेळण्याची लायकी नाही! KL राहुलवर पाकिस्तानवाले सुद्धा भडकले

India vs Australia 3rd Test : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत तीन दिवसांत जिंकल्यानंतर आणि इंदूर कसोटी सुरू होण्यापूर्वी ज्या खेळाडूची सर्वाधिक चर्चा होत आहे तो म्हणजे केएल राहुल. आकाश चोप्रा आणि व्यंकटेश प्रसाद यांच्या युद्धात हरभजन सिंगने उडी घेतली तेव्हा गौतम गंभीरही मागे राहिला नाही. आता पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफनेही केएल राहुलच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

पाकिस्तान संघाचे माजी यष्टिरक्षक फलंदाज रशीद लतीफने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, जेव्हा भारताकडे शुभमन गिलसारखा युवा सलामीवीर आहे, तेव्हा केएल राहुलला संघात स्थान का देत आहे. केएल राहुलची संघात खेळण्याची लायकीचा नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 4 कसोटी मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांमध्ये तो फलंदाजीत अपयशी ठरला. नागपूर कसोटी सामन्यात त्याने 20 धावा केल्या तर दिल्लीत पहिल्या डावात 17 धावा आणि दुसऱ्या डावात एक धाव घेऊन बाद झाला.

इंदूर येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्मासोबत शुभमन गिल सलामी करू शकतो. केएल राहुलला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते. त्याच्याकडून उपकर्णधारपद हिसकावून घेण्याचा याच्याशी संबंध जोडला जात आहे.

आकाश चोप्रा आणि व्यंकटेश प्रसाद यांच्यात केएल राहुलवरून जोरदार भांडण झाले होते. जेव्हा आकाश चोप्राने व्यंकटेश प्रसादला त्याच्या यूट्यूब चॅनलवर अजेंडा पसरवण्यास सांगितले तेव्हा माजी वेगवान गोलंदाजानेही ट्विट करून जोरदार प्रत्युत्तर दिले.

या लढाईत उतरताना हरभजन सिंग म्हणाला, केएल राहुल हा अव्वल दर्जाचा खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण सर्वजण अशा वाईट काळातून गेलो आहोत. हे काही पहिल्यांदा आणि शेवटचं घडत नाहीये. त्यामुळे तोही परतणार आहे.