IND vs AUS: इंदूर खेळपट्टीची बाजू घेण्यासाठी गावसकर उतरले बॅट घेऊन, आयसीसीला दिले फटकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs AUS India legend Sunil Gavaskar LASHES out at ICC after Indore pitch gets 3 demerit points cricket news in marathi

IND vs AUS: इंदूर खेळपट्टीची बाजू घेण्यासाठी गावसकर उतरले बॅट घेऊन, आयसीसीला दिले फटकार

India vs Australia 3rd Test Match : इंदूर कसोटी सामना तीन दिवसापेक्षा कमी वेळात संपला. यानंतर आयसीसीने इंदूरच्या खेळपट्टीला 3 डिमेरिट गुण दिले आणि यासोबत ती खराब असल्याचे म्हटले आहे. भारतीय दिग्गज सुनील गावसकर यांना सर्वोच्च क्रिकेट मंडळाचा निर्णय आवडला नाही आणि त्यांनी त्यावर टीका केली.

इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्माच्या टीम इंडियाला स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना सुनील गावसकर म्हणाले, 'मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे, नोव्हेंबरमध्ये ब्रिस्बेन गाबा येथे एक कसोटी सामना होता. तिथे 2 दिवसात सामना संपला. त्या खेळपट्टीला किती डिमेरिट पॉइंट मिळाले आणि तिथे मॅच रेफरी कोण होता.

मॅच रेफरी ख्रिस ब्रॉड यांनी दोन्ही संघांच्या कर्णधारांशी सल्लामसलत केल्यानंतर, सामना अधिकार्‍यांची चिंता वाढवत आयसीसीला अहवाल सादर केला. मूल्यांकनाच्या परिणामी खेळपट्टीला तीन डिमेरिट गुण देण्यात आले आहेत. आयसीसीने बीसीसीआयला याविरूद्ध 14 दिवसात आपले अपील करण्यास देखील सांगितले आहे.

आयसीसीने माध्यमांना जारी केलेले निवेदन म्हटले, खेळपट्टी ही खूप शुष्क होती. ही खेळपट्टी गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये समतोल निर्माण करत नव्हती. सुरूवातीपासूनच खेळपट्टी ही फिरकीला साथ देत होती. सामन्याच्या पाचव्या चेंडूवरच खेळपट्टीवरून माती उडाली. संपूर्ण सामनाभर असेच सुरू होते. वेगवान गोलंदाजांना कोणतीही मदत मिळत नव्हती. संपूर्ण सामन्याच चेंडू असमान उसळी घेत होता.

सरासरीपेक्षा कमी खेळपट्ट्या असलेल्या स्टेडियमला ​​एक डिमेरिट पॉइंट दिला जातो, तर खराब खेळपट्ट्या असलेल्या स्टेडियमना अनुक्रमे तीन आणि पाच गुण दिले जातात. एखाद्या ठिकाणावर एक वर्षासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट आयोजित करण्यावर बंदी घातली जाईल, जी पाच डिमेरिट पॉइंट्स दिल्यास वाढवली जाते. जेव्हा खेळपट्टीला दहा डिमेरिट गुण दिले जातात, तेव्हा स्टेडियम 24 महिन्यांच्या कालावधीसाठी कोणतेही आंतरराष्ट्रीय क्रिकेट आयोजित करू शकत नाही.