
IND vs AUS 3rd Test Day 2 : भारताचा दुसरा डाव 163 धावात संपुष्टात; ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 76 धावांचे आव्हान
India vs Australia 3rd Test Day 2 Live Cricket Score : ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने भारताची जवळपास संपूर्ण फलंदाजी एकट्याने उडवली. त्याने 64 धावात 8 बळी घेत भारताचा दुसरा डाव एकट्याने 163 धावांवर संपवला.
भारताकडून चेतेश्वर पुजाराने झुंजार 59 धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने 26 आणि अक्षर पटेलने नाबाद 15 धावा करत ऑस्ट्रेलियासमोर मोठे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न लायनने हाणून पाडला. भारताने दुसऱ्या डावात फक्त 75 धावांची आघाडी घेतली. त्यामुळे कांगारूंना विजयासाठी 76 धावांचे माफक आव्हान मिळाले.
आता सामन्याच्या तिसऱ्या दिवशी कांगारूंना हे आव्हान पार करायचं आहे. मात्र भारताने दुसऱ्या दिवशी कांगारूंचे 6 फलंदाज 11 धावात बाद केले होते. त्यामुळे या 76 धावा जरी कमी दिसत असल्या तरी कांगारूंसाठी तिसरा दिवस सोपा नसणार आहे.
लायनने केली सिराजची शिकार
भारताचा दुसरा डाव 163 धावात संपुष्टात आला. लायनने सिराजला बाद करत आपली आठवी शिकार केली. आता ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 76 धावांचे आव्हान आहे.
155-8 : अखेर पुजाराची फडफड थांबली
चेतेश्वर पुजाराने दुसऱ्या डावात 142 चेंडू खेळत 59 धावांची खेळी केली. या खेळीमुळे भारताला 67 धावांची आघाडी घेता आली. मात्र अखेर नॅथन लयॉनने त्याची ही खेळी संपवली अन् भारताला आठवा धक्का दिला.
पुजाराचे झुंजार अर्धशतक
चेतेश्वर पुजाराने झुंजार अर्धशतक ठोकत भारताला अर्धशतकी आघाडी मिळवून दिली.
118-6 : श्रीकार 3 धावांची भर घालून परतला
चेतेश्वर पुजारा एका बाजूने लढत असताना श्रीकार भरत मात्र फक्त 3 धावांचे योगदान देऊन माघारी परतला.
113-5 : अय्यरची आक्रमक खेळी स्टार्कने संपवली
श्रेयस अय्यरने पुजाराची उत्तम साथ देत 27 चेंडूत 26 धावा ठोकत भारताला 25 धावांची आघाडी मिळवून दिली. मात्र स्टार्कने अय्यरची ही खेळी संपवत भारताला पाचवा धक्का दिला.
रवींद्र जडेजाच्या रूपात भारताला चौथा धक्का
भारताला चौथा धक्का रवींद्र जडेजाच्या रूपात बसला आहे. जो 7 धावा करून नॅथन लायनचा बळी ठरला. भारत अजूनही 10 धावांनी पिछाडीवर आहे.
भारताला तिसरा मोठा धक्का, विराट कोहली तंबुत
विराट कोहलीच्या रूपाने भारताला तिसरा धक्का बसला आहे. कोहली 13 धावावर मॅथ्यू कुहनेमनने एलबीडब्ल्यू आऊट झाला. भारताने दुसऱ्या डावात तीन गडी गमावून 69 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने 88 धावांची आघाडी घेतली होती, त्यामुळे भारत अजूनही 19 धावांनी मागे आहे.
कांगारूंने भारताला दिला दूसरा धक्का!
भारताला दुसऱ्या डावात आणखी एक धक्का बसला आहे. शुभमन गिलनंतर कर्णधार रोहित शर्माही बाद झाला आहे. रोहित नॅथन लायनच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू झाला. रोहितला 33 चेंडूत 12 धावा करता आल्या. सध्या चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली क्रीजवर आहेत. भारत अजूनही ऑस्ट्रेलियापेक्षा 55 धावांनी मागे आहे.
कांगारूंने भारताला दिला पहिला झटका! लिओनने शुबमनला केला बोल्ड
भारताला दुसऱ्या डावात पहिला धक्का बसला आहे. उपाहारानंतर पहिल्याच षटकात नॅथन लायनने शुभमन गिलला क्लीन बोल्ड केले. त्याला 15 चेंडूत पाच धावा करता आल्या. सध्या रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा क्रीजवर आहेत. भारत अजूनही ऑस्ट्रेलियापेक्षा 73 धावांनी पुढे आहे.
दुसऱ्या दिवशी दुपारच्या लंचपर्यंत भारत 13/0
लंचपर्यंत भारताने दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता 13 धावा केल्या आहेत. सध्या कर्णधार रोहित शर्मा पाच आणि शुभमन गिल चार धावा करून क्रीजवर आहेत. भारताने पहिल्या डावात 109 धावा केल्या होत्या. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 197 धावांवर आटोपला. अशा प्रकारे कांगारूंनी भारतावर 88 धावांची आघाडी घेतली. भारत सध्या ऑस्ट्रेलियापेक्षा 75 धावांनी मागे आहे.
कांगारूंचा 27 मिनिटांत खेळ खल्लास
शेवटच्या पाच षटकांत ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला. आज दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन डावाच्या 71व्या षटकात दिवसाची पहिली विकेट आणि एकूण सहा विकेट पडल्या आहे. अश्विनने पीटर हँड्सकॉम्बला बाद केले. यानंतर अश्विन आणि उमेश यादवने धुमाकूळ घातला आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने सहा विकेट गमावल्या आहेत. यातील अश्विनने तीन तर उमेशने तीन विकेट्स घेतल्या आहेत.
कांगारूला चार षटकात चार धक्के
टीम इंडियाने टेबल फिरवले आहेत. ऑस्ट्रेलियाला चार षटकात चार धक्के दिले आहेत. 71 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रविचंद्रन अश्विनने पीटर हँड्सकॉम्बला झेलबाद केले. त्याला 98 चेंडूत 19 धावा करता आल्या. यानंतर पुढच्या षटकाच्या म्हणजे 72 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर उमेश यादवने कॅमेरून ग्रीनला एलबीडब्ल्यू आऊट केले, आणि पुढेच्या षटकात स्टार्कला क्लीन बोल्ड केले.
एक तासानंतर भारतीय गोलंदाज रंगात! कांगारूला सहावा धक्का
अखेर या दिवशी एक तासानंतर अश्विनने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याने पीटर हँड्सकॉम्बला झेलबाद केले. 98 चेंडूत 19 धावा करून तो बाद झाला. हँड्सकॉम्ब आणि ग्रीन यांनी 40 धावांची भागीदारी केली.
त्यानंतर पुढेच्या षटकात उमेश यादवला दुसरी विकेट मिळाली. त्याने कॅमेरून ग्रीनला एलबीडब्ल्यू आऊट केले. 21 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर तो बाद झाला.
1 तास झाला पण एकही विकेट...! आघाडी 70 धावांच्या पुढे
आज 1 तासाचा खेळ झाला आहे, पण भारतीय संघाला आज एकही विकेट काढता आलेली नाही. ऑस्ट्रेलियाचे कॅमेरून ग्रीन आणि पीटर हँड्सकॉम्ब शानदार फलंदाजी करत आहेत. कालच्या स्कोअरमध्ये दोघांनीही 30 धावा जोडल्या आहेत. ऑस्ट्रेलियन संघाची आघाडी 70 हून अधिक धावांपर्यंत पोहोचली आहे.
दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू
दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने चार विकेट्सवर 156 धावांच्या पुढे खेळायला सुरुवात केली आहे. पीटर हँड्सकॉम्ब आणि कॅमेरॉन ग्रीन क्रीजवर आहेत. आजच्या पहिल्या षटकात मोहम्मद सिराज गोलंदाजी करत आहे.
काय घडले पहिल्या दिवसात..
रोहित शर्मा पहिल्या षटकात दोनदा बाद, पण ऑस्ट्रेलियाने रिव्ह्यू घेतले नाहीत
रवींद्र जडेजाला फलंदाजीच्या क्रमवारीत बढती देण्याचा अपयशी प्रयोग
ठरावीक अंतराने भारताच्या विकेटस ४/४४ ते ८/८८ आणि १०९ ऑल आऊट
कुहनेमनच्या पहिल्यांदाच पाच विकेट
लबुनेश शून्यावर बाद पण जडेजाचा तो चेंडू नोबॉल
ख्वाजा आणि लबुशेनची ऑस्ट्रेलियाकडून या मालिकेत सर्वांत मोठी भागीदारी.
जडेजाकडूनच लबुशेन बाद त्यानंतर ख्वाजा आणि स्मिथचीही विकेट
भारताने तिन्ही डीआरएस गमावले. विशेष म्हणजे तिन्ही वेळी जडेजाची गोलंदाजी.