IND vs AUS : बदल तर होणारच... पहिल्या ODI सामन्यात कॅप्टन हार्दिक पांड्याने घेतला मोठा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 ind vs aus odi axar patel-hard-to-get-chance-in-playing-11-against-australia-in-1st-odi-match-mumbai-hardik-pandya

IND vs AUS : बदल तर होणारच... पहिल्या ODI सामन्यात कॅप्टन हार्दिक पांड्याने घेतला मोठा निर्णय

India vs Australia 1st ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना उद्यापासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जाणार आहे. स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करेल. कॅप्टन हार्दिक पांड्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत काही मोठे निर्णय घेऊ शकतो.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये अक्षर पटेलला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते आणि त्याच्या जागी शार्दुल ठाकूरचा समावेश केला जाऊ शकतो. रवींद्र जडेजामुळे अक्षर पटेलला दुसरा फिरकी अष्टपैलू म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणे कठीण आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करते, अशा परिस्थितीत अक्षर पटेलच्या जागी शार्दुल ठाकूर टीम इंडियाला चांगला समतोल साधेल.

वेगवान गोलंदाज अष्टपैलू शार्दुल ठाकूरच्या आगमनाने टीम इंडियाला फलंदाज आणि वेगवान गोलंदाजाची जोड मिळते. शार्दुल ठाकूर सुरुवातीच्या आणि शेवटच्या षटकांमध्ये अत्यंत धोकादायक गोलंदाजीसाठी ओळखला जातो.

शार्दुल ठाकूरने टीम इंडियासाठी शेवटचा वनडे जानेवारी 2023 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. टीम इंडियाचा हा खेळाडू यावर्षी 2023 च्या विश्वचषकातही खेळताना दिसु शकतो.

न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या वनडे सामन्यात शार्दुल ठाकूरने शानदार फलंदाजी करताना प्रथम 17 चेंडूत 25 धावा केल्या. या छोट्या झंझावाती खेळीत 1 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता.

यानंतर शार्दुल ठाकूरने अप्रतिम गोलंदाजी करताना 3 बळी घेत टीम इंडियाचा विजय निश्चित केला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 90 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 3-0 असा क्लीन स्वीप केला. शार्दुल ठाकूरला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी 'मॅन ऑफ द मॅच' म्हणून गौरवण्यात आले.

टीम इंडियासाठा शार्दुल ठाकूर सर्वात घातक शस्त्र मानले जाते. शार्दुल ठाकूर धारदार स्विंग गोलंदाजीसह तुफानी फलंदाजी करण्यात माहिर आहे. शार्दुल ठाकूरने आतापर्यंत भारतासाठी 8 कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने 27 बळी घेतले आहेत.

शार्दुल ठाकूरच्या नावावर 34 एकदिवसीय सामन्यात 50 आणि 25 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 33 बळी घेण्याचा विक्रम आहे. शार्दुल ठाकूर खालच्या फळीतही तुफानी फलंदाजी करतो.