IND vs AUS : 'तू जाऊन सांग त्याला...' कॅप्टन हार्दिक पांड्या अंपायरवर गेला धावून Video Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ind vs aus odi Hardik Pandya loses cool has animated chat with umpire after Mitchell Marsh pulls out citing sight screen issue

IND vs AUS : 'तू जाऊन सांग त्याला...' कॅप्टन हार्दिक पांड्या अंपायरवर गेला धावून Video Viral

IND vs AUS 1st ODI सामना: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत अष्टपैलू हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करत आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून हार्दिक पांड्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि कांगारूंचा संघ 35.4 षटकांत 188 धावांवर गारद केला. मैदानात यावेळी हार्दिक पांड्याचा क्रोधित अवतार पहायला मिळाला आहे.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. ट्रॅव्हिस हेड पाच धावा करून आऊट झाला. यानंतर मिचेल मार्शने आपल्या आक्रमक फलंदाजी सुरू ठेवली. यादरम्यान सातव्या षटकात अशी एक घटना घडली ज्याच्यामुळे हार्दिक पांड्या संतापला. हार्दिक पांड्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर धावायला सुरुवात केली तितक्यात मिचेल मार्शने त्याला थांबवले.

कारण साईट स्क्रिनकडून मिचेल मार्शला हालचाली होताना दिसला. यामुळे तो कॉन्सट्रेट झाला नाही. मग काय हार्दिक पांड्या चांगलाच संतापला आणि रागाच्या भरात अंपायरवर धावून गेला. साईट स्क्रिनकडे इशारे करत तो अंपायरवर चांगलाच भडकलेला दिसला.

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 35.4 षटकामध्ये 188 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 2 बाद 129 अशी होती, त्यानंतर संघाने 59 धावा करताना आठ विकेट गमावल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने 19.3 षटकांत 2 बाद 129 धावा केल्या होत्या. त्यानंतर मिचेल मार्श आणि मार्नस लबुशेन क्रीजवर होते.

रवींद्र जडेजाने मार्शला बाद केले आणि त्यानंतर संपूर्ण संघ 35.4 षटकांत गडगडला. म्हणजेच 17 षटकांत भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव संपवला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 65 चेंडूत 81 धावांची खेळी खेळली. याशिवाय एकही फलंदाज चालला नाही. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.