
IND vs AUS : एकाच वनडेत टीम इंडियाच्या 'या' खेळाडूचा सिलेक्टर्सकडून झाला गेम ओव्हर!
India vs Australia ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका 17 मार्चपासून सुरू होत आहे. या वर्षाच्या अखेरीस एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे, अशा परिस्थितीत दोन्ही संघ या मालिकेत आपली पूर्ण ताकद पणाला लावताना दिसतील.
बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाचा उत्साह उंचावला आहे, त्यामुळे आता वनडे मालिकाही जिंकण्याकडे लक्ष लागले आहे. पण भारतीय क्रिकेट संघाच्या एका खेळाडूची वनडे कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच संपताना दिसत आहे.
भारतीय क्रिकेट संघात संधी मिळणे इतके सोपे नसते आणि एखाद्या खेळाडूने संधी वाया घालवली तर त्याच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजेही बंद होतात. असाच एक खेळाडू कुलदीप सेन त्याच्या गोलंदाजीमुळे एक सामना खेळुण संघाबाहेर गेला.
उमरान मलिकसारख्या धोकादायक वेगवान गोलंदाजाला बाहेर बसवून कुलदीप सेनला पदार्पणाची संधी देण्यात आली होती, पण कुलदीप सेन फार काही करू शकला. बांगलादेशविरुद्धच्या त्या वनडे सामन्यात कुलदीप सेन चांगलाच महागात पडला होता.
बांगलादेशविरुद्धच्या त्या एकदिवसीय सामन्यात कुलदीप सेनने केवळ 5 षटकांत 37 धावा दिल्या. कुलदीप सेनला भले 2 विकेट मिळाल्या असतील, पण त्याने 7.40 च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या, जे टीम इंडियासाठी खूप हानिकारक ठरले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 7.40 चा इकॉनॉमी रेट अत्यंत खराब कामगिरी मानला जातो.
गेल्या वर्षी डिसेंबर 2022 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने वेगवान गोलंदाज कुलदीप सेनला मोठ्या आत्मविश्वासाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी दिली होती, पण या खेळाडूने तो विश्वास खराब केला.