IND vs AUS: टीम इंडियाच्या 'या' खेळाडूचं कारकीर्द संपली! BCCIने न सांगता काढले बाहेर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs AUS: टीम इंडियाच्या 'या' खेळाडूचं कारकीर्द संपली! BCCIने न सांगता काढले बाहेर

IND vs AUS: टीम इंडियाच्या 'या' खेळाडूचं कारकीर्द संपली! BCCIने न सांगता काढले बाहेर

IND vs AUS ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 17 मार्चपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळल्या जाणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या वनडे मालिकेत एका खेळाडूकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. टीम इंडियाच्या या खेळाडूची कारकीर्द आता संपल्याचे मानले जात आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जाणार आहे. बीसीसीआयने टीम इंडियाच्या एका खेळाडूला न सांगता काढले बाहेर केले.

बीसीसीआयने वेगवान गोलंदाज हर्षल पटेलला टीम इंडियातून अचानक बाहेर काढले. हर्षल पटेलला गेल्या महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळलेल्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत निवड समितीने टीम इंडियात संधी दिली नव्हती.

आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतही त्याचा समावेश करण्यात आला आहे. यावरून निवडकर्त्यांनी सूचित केले की हर्षल पटेल भारतीय टी-20 आणि एकदिवसीय संघात संधी देण्यास पात्र नाही. हर्षल पटेलने टीम इंडियासाठी आतापर्यंत 25 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये या वेगवान गोलंदाजाने केवळ 29 विकेट्स घेतल्या आहेत.

मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शिवम मावी आणि शार्दुल ठाकूर सारखे घातक वेगवान गोलंदाज आता टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी करत आहेत. अशा परिस्थितीत आता ३२ वर्षांच्या हर्षल पटेलला भविष्यात संधी मिळेल असे वाटत नाही.

हर्षल पटेलला आणखी एक ते दोन वर्षे संधी मिळाली नाही, तर त्याला निवृत्ती घ्यावी लागू शकते. हर्षल पटेलने त्याच्या शेवटच्या 8 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये फक्त 6 विकेट घेतल्या आहेत. त्याच वेळी हर्षल पटेलने त्याच्या शेवटच्या 12 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 5 वेळा 40 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. या कमकुवतपणामुळे हर्षल पटेल आता टीम इंडियात स्थान घेण्यास पात्र नाही.