Hardik Pandya : हार्दिकच होणार टीम इंडियाचा कॅप्टन फक्त..., गावसकरांचे मोठे विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ind vs aus sunil gavaskar-said-hardik pandya-may-replace-rohit sharma-as-team-india-odi-captain cricket news in marathi kgm00

Hardik Pandya : हार्दिकच होणार टीम इंडियाचा कॅप्टन फक्त..., गावसकरांचे मोठे विधान

Sunil Gavaskar on Hardik Pandya : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका संपताच वनडे मालिका खेळल्या जाणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पहिला सामना 17 मार्चला खेळल्या जाईल. टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा या मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळताना दिसणार नाही. त्याच्या जागी हार्दिक पांड्या संघाची धुरा सांभाळणार आहे. या सगळ्या दरम्यान भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी टीम इंडियाच्या पुढील वनडे कर्णधाराबाबत मोठा दावा केला आहे.

यंदाच्या विश्वचषकानंतर एकदिवसीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी हार्दिक पांड्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवावा लागेल, असा विश्वास सुनील गावसकर यांनी व्यक्त केला. नियमित कर्णधार रोहित शर्मा कौटुंबिक बांधिलकीमुळे वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळू शकणार नाही.

हार्दिक पंड्याने इंडियन प्रीमियर लीग 2022 सीझनमध्ये पहिल्यांदाच गुजरात टायटन्सचे नेतृत्व केले आणि संघाला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. तो आधीच टी-२० मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे.

गावसकर यांनी स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, गुजरात टायटन्स आणि त्यानंतर टी-20 फॉरमॅटमध्ये भारतासाठी त्याच्या कर्णधारपदाने मी खूप प्रभावित केले आहे. मला विश्वास आहे की जर त्याने मुंबईतील पहिला सामना जिंकला तर 2023 मध्ये वर्ल्ड कप संपल्यानंतर भारताच्या कर्णधारपदासाठी त्याच्या नावावर शिक्कामोर्तब करू शकता.

सुनील गावसकर पुढे म्हणाले, तो एक असा खेळाडू आहे जो जबाबदारी घेण्यास तयार असतो. समोरून संघाचे नेतृत्व करतो. तो या संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. पांड्याच्या कर्णधारपदाची शैली त्याला इतर खेळाडूंमध्येही आवडते बनवते. तुम्ही पाहिले असेल की कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या इतर खेळाडूंना आरामात ठेवतो. खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवून तो परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळतो.